JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या
JD Vance Residence Attacked: अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर यूएस सीक्रेट सर्विसचे एजंट ईस्ट वलनट येथे दाखल झाले आणि त्यांना एकाला अटक केली.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. सुरक्षा दलांनी एका व्यक्तीला देखील अटक केली आहे. या हल्ल्यासंदर्भातील एक फोटो समोर आला आहे.ज्यामध्ये जेडी व्हॅन्स यांच्या घराची खिडकी तुटलेली दिसून येते. या हल्ल्यानंतर यूएस सीक्रेट सर्विसचे एजंट ईस्ट वालनट येथे पोहोचले आणि त्यांनी एका संशयिताला अटक केली. अधिकाऱ्यांनी मात्र त्या व्यक्तीच्या विरोधात आरोप निश्चित केलेली आहे की नाही हे स्पष्ट केलं नाही.
सीएनएनच्यारिपोर्टनुसार प्राथमिक चौकशीत अधिकाऱ्यांच्या मते संशयित उपराष्ट्रपतींच्या घरात घुसला नव्हता. हल्ल्यावेळी जेडी व्हॅन्स किंवा त्यांचे कुटुंबीय देखील घरी नव्हते. गेल्या आठवड्यात अमेरिकेनं व्हेनेझुएलात जे ऑपरेशन राबवण्यात आलं होतं, त्याची लाईव्ह अॅक्शन पाहण्यासाठी ते ट्रम्प यांच्यासोबत देखील जेडी व्हॅन्स नव्हते. जेडी व्हॅन्स यांच्या कार्यालयानं ते नियोजनात होते असं सांगण्यात आलं.
उपराष्ट्रपतींच्या घराची सुरक्षा वाढवली
स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या जवळील रस्ते रविवार पर्यंत कित्येक दिवसांपासून बंद होते. तिथं पोलीस ठाणी निर्माण केली गेली होती. स्थानिक लोकांना पोलिसांच्या उपस्थितीबाबत सांगण्यात आलं होतं. FOX19 NOW च्या रिपोर्टनुसार सिनसिनाटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या सीक्रेट सर्विसच्या अधिकाऱ्यानं रात्री 12.15 वाजता घराच्या जवळून एका व्यक्तीला धावताना पाहिलं.
अमेरिकन अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु
अमेरिकन सीक्रेट सर्विसचे जवान स्थानिक पोलिसांंसह जेडी व्हॅन्स यांच्या घरी पोहोचले. त्यांनी तिथल्या सुरक्षेचा आढावा घेतला आणि प्राथमिक चौकशीत सहकार्य केलं. व्हॅन्स यांच्या घरी काळ थांबल्यानंतर सीक्रेट सर्विसचे जवान निघून गेले. संशयित व्यक्तीनं हल्ला का केला हे स्पष्ट झालं नाही. अधिकाऱ्यांच्या मते ते पुरावे मिळवत आहेत.























