World Cup Qualifiers : 4 संघाचं विश्वचषकाचं स्वप्न भंगलं, क्वालिफायरमधून बाहेर, आता 6 संघामध्ये लढत
Points Table : वनडे विश्वचषकातील क्वालिफायर सामने झिम्बाब्वेमध्ये येथे सुरु आहेत.
![World Cup Qualifiers : 4 संघाचं विश्वचषकाचं स्वप्न भंगलं, क्वालिफायरमधून बाहेर, आता 6 संघामध्ये लढत ireland uae nepal united states out form icc cricket world cup qualifiers 2023 points table World Cup Qualifiers : 4 संघाचं विश्वचषकाचं स्वप्न भंगलं, क्वालिफायरमधून बाहेर, आता 6 संघामध्ये लढत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/27/93c57b946b71bf05351324ca0b4dcfad1687869399229265_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ICC World Cup Qualifiers 2023 Points Table : वनडे विश्वचषकातील क्वालिफायर सामने झिम्बाब्वेमध्ये येथे सुरु आहेत. दहा संघामध्ये सुपर 6 साठी स्पर्धा सुरु होती. या सहा संघाचे चित्र आता जवळपास स्पष्ट झालेय. चार संघाचे विश्वचषकात खेळण्याचे स्वप्न भंगले आहे.
आयरलँड, नेपाळ, यूएई आणि यूनाइटेड स्टेट्स या चार संघाचे 2023 वनडे वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. आता सहा संघामध्ये स्पर्धा रंगणार असून यातील दोन संघ भारतात होणाऱ्या विश्वचषकात सहभागी होतील.
सुपर-6 मध्ये कोणते संघ पोहचले -
4 संघाचे आव्हान संपले तर दुसरीकडे सहा संघांनी सुपर 6 मध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये श्रीलंका, झिम्बाब्वे, नीदरलँड, स्कॉटलँड, ओमान आणि वेस्ट इंडीज या संघांचा समावेश आहे. यातील दोन संघ विश्वचषक खेळण्यासाठी पात्र ठरतील. दोन वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजचे आव्हान खडतर झालेय.
29 ऑगस्टपासून सुपर-6 स्पर्धा रंगणार -
क्वालिफायर राऊंडमधील सुपर 6 सामने 29 ऑगस्टपासून सुरु होणार आहेत. याची फायनल 9 जुलै रोजी होणार आहे. क्वालिफायरमधून दोन संघ विश्वचषकाचे सामने खेळणार आहे. भारतात होणारा वनडे विश्वचषक दहा संघामध्ये होणार आहे. एकदिवसीय क्रमवारीनुसार आठ संघ पात्र झाले आहेत. उर्वरित दोन संघ क्वालिफायरमधून पात्र होतील. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका हे संघ पात्र ठरले आहेत. ऑक्टोबरमध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने विश्वचषकाची स्पर्धा रंगणार आहे.
राउंड रॉबिन फॉर्मेट काय आहे ?
राउंड रॉबिन आणि नॉकआउट पद्धतीने सर्वात आधी 1992 मध्ये विश्वचषक स्पर्धा झाली होती. राउंड रॉबिन पद्धत म्हणजे, या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाची एकमेकांशी लढत होते. यात कोणत्याही संघाला कमी किंवा जास्त करता येत नाही. प्रत्येक संघाला त्यांची ताकद अजमावण्याची संधी मिळते. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान या संघांना दावेदार मानलं जात आहे. मात्र, बांगलादेश, अफगाणिस्तान अथवा इतर कोणताही कमकुवत संघ टॉप 4 मध्ये पोहचू शकतो. सेमीफायनलमध्ये पोहचल्यानंतर नॉकआऊट पद्धतीने सामने होतील. पहिल्या क्रमांकावर असणारा संघ चौथ्या स्थानावर असलेल्या संघासोबत खेळेल तर दुसऱ्या क्रमांकाचा संघ तिसऱ्या संघासोबत खेळेल. त्यानंतर विजेत्या दोन संघामध्ये फायनलचा थरार रंगेल.
आणखी वाचा :
World Cup 2023 : विश्वचषकाचे वेळापत्रक एका क्लिकवर, पाहा कोणत्या मैदानावर रंगणार सामने
पाकिस्तानला झटका, अहमदाबादच्याच मैदानावर रंगणार भारत-पाकिस्तानचा थरार
ICC Cricket WC 2023: विराट कोहलीसाठी विश्वचषक जिंका - वीरेंद्र सेहवाग
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)