Pune NCP Office : कार्यालय राष्ट्रवादीचं, राजकारण वादाचं; कार्यालय बांधणरी कल्पवृक्ष पार्थ पवारांची? Special Report
Pune NCP Office : कार्यालय राष्ट्रवादीचं, राजकारण वादाचं; कार्यालय बांधणरी कल्पवृक्ष पार्थ पवारांची? Special Report
प्रचारसभा असो की पत्रकार परिषद.... पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपनं भ्रष्टाचाराचा कसा चिखल करून ठेवलाय, हे सांगताना अलिकडे अजितदादा अजिबात थकत नाहीयेत... पण त्याच वेळी पार्थ पवारांवर झालेल्या आरोपांबद्दल विचारलं, की ते मुरलीधर मोहळांकडे बोट दाखवतात... असं असताना आता पार्थ पवारांवर नवा आरोप झालाय... पुण्यातच आणखी एक जमीन लाटल्याचा... बघुयात त्यावर हा स्पेशल रिपोर्ट...
पुणे महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू असताना आणि पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेल्या असताना अजित पवारांची डोकेदुखी आता वाढलीय.
कारण पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचं कार्यालय जिथे बांधण्यात आलंय
ती डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनची जागा बळकावण्यात आल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलाय...
ज्या कल्पवृक्ष कंपनीनं ही इमारत उभारली ती कंपनी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांशी संबंधित आहे आणि त्याच्या संचालक सुनेत्रा पवारही राहिल्यात अशी माहिती मिळतेय.
त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आधीच मुंढवा जमीन घोटाळ्याचे आरोप असणारे त्यांचे पुत्र पात्र पवार हे पुन्हा एकदा नव्या घोटाळ्याच्या निमित्तानं चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत.
All Shows

































