(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ICC Cricket WC 2023: विराट कोहलीसाठी विश्वचषक जिंका - वीरेंद्र सेहवाग
ICC Cricket WC 2023 : विश्वचषक वेळापत्रकाच्या अनावरणाला भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग उपस्थित होता.
ICC Cricket WC 2023 : भारतात होणाऱ्या विश्वचषक वेळापत्रकाची आज घोषणा झाली. 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार असून 8 ऑक्टोबरला भारताचा पहिला सामना होणार आहे. वेळापत्रकाच्या अनावरणाला भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग उपस्थित होता. यावेळी हॉटस्टारशी बोलताना विरेंद्र सेहवाग याने विश्वचषकाच्या चार दावेदार संघ कोणते असू शकतात, याबाबत सांगितले. त्याशिवाय विराट कोहली आणि धोनीबद्दलही भाष्य केले. विराट कोहलीसाठी विश्वचषक जिंकायला हवा, असे वक्तव्य वीरेंद्र सेहवाग याने केले आहे.
भारतीय संघातील प्रत्येकाने विराट कोहलीसाठी विश्वचषक जिंकायला हवा. विराट कोहली हा ग्रेट खेळाडू तर आहेच. त्याशिवाय तो चांगला माणूसही आहे. तो नेहमीच इतर खेळांडूना मदत करण्यासाठी पुढे येतो. विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्यामध्ये खूप समानता आहे. मोठ्या स्पर्धेत अथवा सामन्यात विराट कोहली इतरांपेक्षा जास्त चांगली कामगिरी करतो, असे विरेंद्र सेहवाग म्हणाला.
Virender Sehwag said, "everyone needs to win this World Cup for Virat Kohli. The kind of great player he is, a great human being also, he always helps other players". pic.twitter.com/tgxMpZFxK7
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 27, 2023
धोनीबद्दल काय म्हणाला सेहवाग ?
2011 च्या विश्वचषक सामन्यादरम्यान एमएस धोनीने फक्त खिचडी खाल्ली होती. एखाद्या मोठ्या स्पर्धेवेळी प्रत्येकजण अंधश्रद्धाळू (superstitious)असतो.. धोनीनेही 2011 मध्ये फक्त खिचडी खाल्ली होती.
Virender Sehwag's Semi Finalists for the 2023 World Cup: विश्वचषक विजयाचे दावेदार कोणते ?
वीरेंद्र सेहवाग याने यावेळी यंदाचा विश्वचषक जिंकू शकणाऱ्या चार संघाची निवड केली. हॉटस्टारशी बोलताना सेहवागने सेमीफायनलचे चार संघ निवडले. यामध्ये भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघाचा समावेश आहे.
विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर -
आगामी आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा मुंबईत करण्यात आली. मंगळवार 27 जूनपासून ही स्पर्धा सुरू होण्याकरता 100 दिवसांचं काऊंटडाऊन सुरू झाल्यानं आयसीसीनं या सोहळ्याचं आयोजन केलं होतं. भारतातील 10 स्टेडियममध्ये यंदाच्या विश्वचषकाचे सामने खेळवले जातील. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 5 ऑक्टोबरला गतवेळचे विजेते आणि उप विजेते यांच्यात सामना रंगणार आहे. त्यानंतर दीड महिन्यांच्या स्पर्धेनंतर 19 नोव्हेंबरला याच स्टेडियमवर वर्ल्डकपची फायनल खेळवली जाईल. त्याआधी 15 नोव्हेंबरची पहिली सेमीफायनल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर तर 16 नोव्हेंबरची दुसरी सेमीफायनल कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळवली जाईल. आणि स्पर्धेच्या पहिल्या टप्यात 15 ऑक्टोबर रोजी तमाम भारतीयांसह संपूर्ण जगातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागलेला भारत पाकिस्तान हा महामुकाबला होईल.
आणखी वाचा :
World Cup 2023 : विश्वचषकाचे वेळापत्रक एका क्लिकवर, पाहा कोणत्या मैदानावर रंगणार सामने
पाकिस्तानला झटका, अहमदाबादच्याच मैदानावर रंगणार भारत-पाकिस्तानचा थरार