एक्स्प्लोर

Virat Kohli: 'काय होईल, जर मी...' खराब फॉर्मशी झुंज देणार्‍या विराटच्या इन्स्टाग्राम पोस्टनं वेधलं सर्वांचं लक्ष 

ENG vs IND: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे.

ENG vs IND: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. विराट कोहलीची बॅट मागील अडीच वर्षापासून शांत आहे. इंग्लंड दौऱ्यात विराट त्याच्या शतकाचा दुष्काळ संपवेल, अशी अपेक्षा होती. परंतु, इंग्लंडविरुद्धही त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. विराट कोहलीवरून भारतीय संघात दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. एक गट विराटची पाठराखण करतोय. तर, दुसरा गट त्याला संघाबाहेर करण्याची मागणी करतोय. याच पार्श्वभूमीवर विराट कोहलीनं त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केलीय. 

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या विराट कोहलीनं आतापर्यंत 11, 20, 1, 11 आणि 16 धावा केल्या आहेत. यामुळं विराट कोहलीला विश्रांती देण्यात यावी किंवा त्याच्याऐवजी दुसऱ्या खेळाडूला संघात संधी द्यावी, अशा मागणींनी जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर विराटनं इंन्स्टावर पोस्ट करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यानं या पोस्टच्या माध्यमातून सकारात्मक आणि नकारात्मक दृष्टिकोण स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. 

विराटची इन्स्टाग्राम पोस्ट- 

विराट कोहलीची सकारात्मक पोस्ट
विराट कोहलीनं एका भिंतीजवळ बसून फोटो काढलाय. त्या भिंतीवर "मी पडलो तर काय? ओह, माय डार्लिंग, तू उडालास तर काय?" असा मॅसेज लिहला गेलाय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये विराटनं दुष्टीकोन असं लिहलंय. त्याच्याबाबत सुरु असलेल्या चर्चांवर विराटनं उपरोधिपणे भाष्य केलं आहे. कोहलीची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

मागील अडीच वर्षांपासून विराटची बॅट शांत
विराट कोहलीनं 2022 मध्ये 18 डावांमध्ये 25.50 च्या सरासरीनं 459 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 79 धावा आहे. कोहलीनं शेवटचं शतक नोव्हेंबर 2019 मध्ये झळकावलं होतं. सध्या सुरू असलेल्या इंग्लंड दौऱ्यावरही कोहली धावा काढण्यासाठी झगडत आहे. मागील अडीच वर्षात त्याच्या बॅटमधून एकही अर्धशतक झळकलं नाही. भारतीय संघ रविवारी इंग्लंडविरुद्ध तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना खेळणार आहे. या सामन्यात विराट कोहली कशी कामगिरी करतो? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. 

वेस्ट इंडीजविरुद्ध टी-20 मालिकेतून विराटला वगळलं
इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना खेळल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारत वेस्ट इंडीजशी तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. दरम्यान, टी-20 मालिकेसाठी भारतानं संघ जाहीर केलाय. यामध्ये रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर, विराट कोहलीला डच्चू देण्यात आला आहे. तसेच वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याला संघात स्थान मिळत का? हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल. 

हे देखील वाचा- 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : लंडनमधील रस्त्यावर कोहली 'बापल्योक' एकत्र, विराट कोहली आणि अकायचा व्हिडीओ व्हायरल 
लंडनमधील रस्त्यावर कोहली 'बापल्योक' एकत्र, विराट कोहली आणि अकायचा व्हिडीओ व्हायरल 
Team India: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली; चर्चा तर होणारच
Video: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली; चर्चा तर होणारच
Sam Curran : वानखेडे स्टेडियमवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, इंग्लंडच्या सॅम करनचा 'पॅट कमिन्सच्या' स्टाईलमध्ये भारताला इशारा
वानखेडेवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, मैदान शांत ठेवणार,इंग्लंडच्या सॅम करनचा इशारा
Team India : टीम इंडियानं इंग्लंडच्या 'त्या' खेळाडूपासून सावध राहावं, सुनील गावस्कर यांचा सूर्या ब्रिगेडला सल्ला, संजू सॅमसनबद्दल म्हणाले...
टीम इंडियानं इंग्लंडच्या 'त्या' खेळाडूपासून सावध राहावं, सुनील गावस्कर यांचा सूर्या ब्रिगेडला सल्ला, संजू सॅमसनबद्दल म्हणाले...

व्हिडीओ

Iran Drone : इराणी ड्रोनची भरारी, अमेरिकेची उडली भंबेरी? युद्ध अधिक लांबल्यास अमेरिकेची चिंता वाढणार? Special Report
CCTV Hack Special Report : सीसीटीव्ही हॅकिंग, ऑपरेशन खामेनींचं प्लनिंग, इस्त्रायलच्या हजारो नजरा
Golesten Palace Special Report : इराणमधील 500 वर्ष जुन्या वास्तूचं गोलेस्टन पॅलेसचं युद्धात नुकसान
Team India Special Report: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली
Pakistan Operation Sindoor Special Report : भीती ऑपरेशन सिंदूरची, भाषा बदलली पाकची, पाकिस्तानची झोप उडाली?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijay Wadettiwar: राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला, तर विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरेंना मिळावी; विजय वडेट्टीवारांनी सांगितली 'मन कि बात', म्हणाले....
राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला, तर विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरेंना मिळावी; विजय वडेट्टीवारांनी सांगितली 'मन कि बात', म्हणाले....
मोठी बातमी! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे ऑडिट होणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय; नेमकं कारण काय?
मोठी बातमी! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे ऑडिट होणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय; नेमकं कारण काय?
Pandharpur Viral Video : पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
Israel Iran War : दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला, इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्री ठार
दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला, इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्री ठार
Aaditya Thackeray : राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
Actor Vikas Samudre On Sachin Pilgaonkar Trolling: 'पन्नाशी, साठीतला व्यक्ती सचिन पिळगावकरांना ट्रोल करत नाहीय, जेन-झी करतायत...'; मराठी अभिनेत्याचे खडे बोल
'पन्नाशी, साठीतला व्यक्ती सचिन पिळगावकरांना ट्रोल करत नाहीय, जेन-झी करतायत...'; मराठी अभिनेत्याचे खडे बोल
Iran Nuclear Radiation Risk : संघर्ष वाढला तर इराणमध्ये न्युक्लिअर रेडिएशनचा धोका? किती देशांना फटका बसणार?
संघर्ष वाढला तर इराणमध्ये न्युक्लिअर रेडिएशनचा धोका? किती देशांना फटका बसणार?
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
Embed widget