World Athletics Championships: मुरली श्रीशंकरची ऐतिहासिक कामगिरी; पुरुषांच्या लाबं उडी फायनलसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय
भारतीय लांब उडीपटू मुरली श्रीशंकर ( Murali Sreeshankar) शनिवारी अमेरिकेतील ओरेगॉन येथे सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या लांब उडीच्या अंतिम फेरीत धडक दिलीय.
![World Athletics Championships: मुरली श्रीशंकरची ऐतिहासिक कामगिरी; पुरुषांच्या लाबं उडी फायनलसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय World Athletics Championships 2022 Murali Sreeshankar Becomes First Ever Indian To Qualify For Men's Long Jump Final World Athletics Championships: मुरली श्रीशंकरची ऐतिहासिक कामगिरी; पुरुषांच्या लाबं उडी फायनलसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/16/068ae7537a11c727a73ed68bdeddfd291657957282_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
World Athletics Championships 2022: भारतीय लांब उडीपटू मुरली श्रीशंकर (Murali Sreeshankar) शनिवारी अमेरिकेतील ओरेगॉन येथे सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या लांब उडीच्या अंतिम फेरीत धडक दिलीय. पात्रता फेरीत तो सातव्या स्थानावर राहिला. जगात तेराव्या क्रमांकावर असलेला श्रीशंकर 8 मीटर लांब उडी मारून पुरुषांच्या लाबं उडी फायनलमध्ये स्थान मिळवंल. अशी कामगिरी करणारा श्रीशंकर पहिलाच भारतीय ठरलाय. श्रीशंकरच्या या कामगिरीनंतर संपूर्ण देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
श्रीशंकरचं दमदार प्रदर्शन, अविनाश साबळेचेही अंतिम फेरीत धडक
या हंगामात श्रीशंकरनं आतापर्यंत सातत्यानं चांगली कामगिरी करून दाखवली आहे. मुरली श्रीशंकर जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारा पहिला पुरुष लांब उडीपटू ठरला. तर, 3000 मीटर स्टीपलचेस ऍथलीट अविनाश साबळे याने स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अपेक्षेप्रमाणे अंतिम फेरीत प्रवेश केला. मोसमातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या श्रीशंकरने 'ब' गटातील पात्रता फेरीत संपूर्ण आठ मीटर उडी मारून सातवं स्थान पटकावलं. आता जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत तो कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
जेस्विन आल्ड्रिन आणि मोहम्मद अनीस याहिया यांना अपयश
मुरली श्रीशंकर व्यतिरिक्त, भारतीय लांब उडीपटू जेस्विन आल्ड्रिन आणि मोहम्मद अनीस याहिया अनुक्रमे 7.79 मीटर आणि 7.73 मीटरच्या प्रयत्नांसह पुढील टप्प्यात पोहोचू शकले नाहीत. त्याच वेळी, अविनाश साबळे पुरुषांच्या लांब उडी आणि पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत अंतिम फेरीत पात्र ठरला.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)