एक्स्प्लोर

Singapore Open: पीव्ही सिंधूची सिंगापूर ओपनच्या अंतिम फेरीत धडक, सेमीफायनलमध्ये सेईना कावाकामीला नमवलं

Singapore Open 2022: सिंगापूर ओपन स्पर्धेत पीव्ही सिंधूनं आतापर्यंत चांगली कामगिरी करून दाखवली आहे.

Singapore Open 2022: भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं (PV Sindhu) शनिवारी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत खालच्या मानांकित जपानच्या सेईना कावाकामीचा (Saena Kawakami) पराभव करत सिंगापूर ओपनच्या अंतिम फेरीत (Singapore Open 2022 FinaL) धडक दिलीय. या वर्षी सय्यद मोदी इंटरनॅशनल आणि स्विस ओपनमध्ये दोन सुपर 300 विजेतेपद पटकावणाऱ्या दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूनं 32 मिनिट सुरु असलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सेईना कावाकामीचा 21-15, 21-7 असा पराभव केला. 

उपांत्य फेरीत पीव्ही सिंधुचा एकहाती विजय
पीव्ही सिंधूनं चीनच्या हान युईचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या पीव्ही सिंधूनं पहिला सेट गेम गमावल्यानंतर 17-21, 21-11, 21-19 असा विजय मिळवला होता. सिंधूसाठी उपांत्यपूर्व फेरीचा सामना जितका कठीण होता, तितकाच उपांत्य फेरीतील सामना सोपा होता.  तिनं कावाकामीचा अवघ्या 30 मिनिटांत कावाकामीचा पराभव केला.

विजेतेपदाच्या लढतीत कोणाशी सामना?
सिंगापूर ओपनच्या विजेतेपदाच्या लढतीत पीव्ही सिंधूचा सामना जपानच्या अया ओहोरी किंवा चीनच्या जी यी वांग यांच्याशी होईल. जपानच्या अया ओहोरीनं उपांत्यपूर्व फेरीत भारतीय स्टार सायना नेहवालचा  21-13, 15-21, 22-10 असा पराभव केला होता. ओहोरीला आता विजेतेपदाच्या लढतीत सिंधूचा सामना करण्यासाठी जी यी वांगला पराभूत करावं लागेल.

पीव्ही सिंधूची चमकदार कामगिरी
पीव्ही सिंधू सातत्यानं उत्कृष्ट कामगिरी करत आहे. यावर्षी मार्चमध्ये झालेल्या स्विस ओपननंतर तिनं प्रथमच एखाद्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय. सिंधूनं स्विस विजेतेपदावर कब्जा केला होता. तिनं स्विस ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफानचा 21-16, 21-8 असा पराभव केला होता.

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

Duleep Trophy : सरफराज खान टीम इंडियात येताच मोठा ट्विस्ट; 25 वर्षांच्या खेळाडूचं नशीब एका रात्रीत पालटलं, संघात झाली निवड
सरफराज खान टीम इंडियात येताच मोठा ट्विस्ट; 25 वर्षांच्या खेळाडूचं नशीब एका रात्रीत पालटलं, संघात झाली निवड
Sourav Ganguly : आधी पत्र आलं... मग थेट जीवे मारण्याची धमकी! ‘ती’ पत्र मिळताच सौरव गांगुलीने थेट पोलीस स्टेशन गाठलं, धमकीमागे कोणाचा हात? खळबळजनक माहिती समोर
आधी पत्र आलं... मग थेट जीवे मारण्याची धमकी! ‘ती’ पत्र मिळताच सौरव गांगुलीने थेट पोलीस स्टेशन गाठलं, धमकीमागे कोणाचा हात? खळबळजनक माहिती समोर
426 कोटींच्या निधीनंतरही गुजरातच्या पदकांची झोळी रिकामी; कमी पैशांत हरियाणा-महाराष्ट्र-मणिपूरचा डंका, चकीत करणारी आकडेवारी
426 कोटींच्या निधीनंतरही गुजरातच्या पदकांची झोळी रिकामी; कमी पैशांत हरियाणा-महाराष्ट्र-मणिपूरचा डंका, चकीत करणारी आकडेवारी
IND vs SL Playing XI : वॉर्म-अप मॅचमध्येच झाला गेम! कर्णधार गिल 3 नामांकित खेळाडूंना बेंचवरच सडवणार?, प्लेइंग-11 मधून OUT, एक तर डेब्यूची वाट बघतोय
वॉर्म-अप मॅचमध्येच झाला गेम! कर्णधार गिल 3 नामांकित खेळाडूंना बेंचवरच सडवणार?, प्लेइंग-11 मधून OUT, एक तर डेब्यूची वाट बघतोय

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
Embed widget