एक्स्प्लोर

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेसाठी 'रोहित ब्रिगेड'चा कसून सराव सुरु, 10 फिरकीपटूंना घेऊन सुरु आहे प्रॅक्टिस 

Nagpur Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारीपासून नागपूर येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडिया तब्बल 10 फिरकीपटूंसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसत आहे. 

India vs Australia 1st Test Match Nagpur : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपुरात होणार आहे. 9 फेब्रुवारीपासून खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय संघाची जोरदार तयारी सुरू आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया सराव करत मैदानात घाम गाळत आहे. विशेष गोष्ट म्हणजे संघाच्या कॅम्पमध्ये एकूण 10 फिरकीपटू आहेत. जे खेळाडूंची प्रॅक्टिस घेत आहेत. त्यामुळे फिरकीपटूंना घेऊन रोहितचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध खास रणनीती आखत असल्याचं दिसून येत आहे.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या दोन सामन्यांसाठीच भारताने संघ घोषित केला आहे. यामध्ये कुलदीप यादवचा संघात फिरकी गोलंदाज म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा आणि अक्षर पटेल यांना अष्टपैलू फिरकीपटू म्हणून संघात स्थान देण्यात आलं आहे. अशा प्रकारे टीम इंडियामध्ये एकूण चार फिरकीपटू आहेत. पण भारतीय कॅम्पमध्ये सध्या 10 फिरकीपटू आहेत. जे सर्व फलंदाजांना नेटमध्ये सराव करून घेत आहेत आणि स्वत:चाही सराव करुन घेत ​आहेत. टीम इंडियाच्या कॅम्पमध्ये जाडेजा, अश्विन, अक्षर आणि कुलदीप तसेच वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार, जयंत यादव, पुलकित नारंग, साई किशोर आणि राहुल चहर यांचा समावेश आहे. हे सर्व गोलंदाज कसून सराव करत आहेत. भारतीय संघाने यापूर्वीच साई किशोर, राहुल, सौरभ आणि सुंदर यांची नेट गोलंदाज म्हणून निवड केली होती. यानंतर जयंत आणि नारंग यांचाही आता समावेश करण्यात आला.

भारताचा दबदबा

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर यात टीम इंडियाचा वरचष्मा दिसून येत आहे. ही मालिका पहिल्यांदा 1996-97 मध्ये खेळली गेली होती. भारताने तेव्हा मालिका 1-0 ने जिंकली होती. यानंतर टीम इंडियाने दुसऱ्यांदाही विजय मिळवला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 2020-21 मध्ये शेवटची मालिका खेळली गेली होती. ही देखील टीम इंडियाने 2-1 ने जिंकली होती. विशेष म्हणजे त्यावेळी भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मातृभूमीत जाऊन मात दिली होती. 

ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ (India’s squad for first 2 Tests vs Australia) -

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकिपर), ईशान किशन (विकेटकिपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जाडेजा, मोहम्मद सिराज, उमेश यादव. जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Sharad Pawar : शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Solapur : सोलापुरात महाविकास आघाडीत नेमकं काय घडतंय?Ulhas Bapat Vidhansabha Election 2024 : 26 नोव्हेंबरच्या आज  सरकार स्थापन झाल्यास राष्ट्रपती राजवटMVA Leaders Meeting : अपक्ष आमदारांशी मविआकडून संपर्क; निकालाआधीच मविआची सरकार स्थापनेचे रणनीतीABP Majha Headlines :  12 PM : 22 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Sharad Pawar : शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
Baba Siddique Case Update: बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
Sharad Pawar : एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
मुंबईतील सर्वात धक्कादायक निकाल; वर्सोव्यात ठाकरेंचा मुस्लीम उमेदवार जिंकणार, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
मुंबईतील सर्वात धक्कादायक निकाल; वर्सोव्यात ठाकरेंचा मुस्लीम उमेदवार जिंकणार, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Sharad Pawar:  मोठी बातमी: विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात; नारायण राणेंचा खळबळजनक दावा
विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात; नारायण राणेंचा खळबळजनक दावा
Embed widget