VIDEO : टीम इंडियात पुनरागमनासाठी जाडेजा तयार,जर्सी पाहून भावनिक, म्हणाला...
IND vs AUS, Test Series: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिल्या कसोटीसाठी जाडेजा मैदानात उतरणार आहे. तो बऱ्याच काळानंतर संघात परतलाआहे.
IND vs AUS, 1st Test : भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) टीम इंडियात (Team India) पुनरागमनासाठी फारच उत्सुक दिसत आहे. 9 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी जाडेजा भारतीय संघाचा भाग आहे. सध्या या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. ज्यात जाडेजा असून तो अंतिम 11 मध्येही असणार हे जवळपास निश्चित झाले आहे. दरम्यान आता बीसीसीआयने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये जाडेजा त्याच्या पुनरागमनाबद्दल बोलताना दिसत आहे. भारतीय जर्सीबद्दलही त्याने खास वक्तव्य केलं. व्हिडीओमध्ये जाडेजाने सांगितलं की, तो संघात परतण्यासाठी उत्सुक आहे.
या व्हिडीओमध्ये बोलताना जाडेजा म्हणतो, “पाच महिन्यांहून अधिक काळानंतर भारतीय जर्सी घालणार आहे. मी यासाठी उत्सुक आहे. मी स्वत:ला धन्य समजतो की, मला ही संधी पुन्हा मिळाली. हा प्रवास चढ-उतारांनी भरलेला होता. पाच महिने क्रिकेटपासून दूर राहणे निराशाजनक आहे. NCA मधील फिजिओ आणि प्रशिक्षकांनी माझी खूप मदत केली आणि मला खूप वेळ दिला आहे. रविवारी (NCA मध्ये सुट्टी असताना) सुद्धा ते माझ्यासाठी येत होते."
पाहा VIDEO-
Excitement of comeback 👌
— BCCI (@BCCI) February 5, 2023
Story behind recovery 👍
Happiness to wear #TeamIndia jersey once again 😊
All-rounder @imjadeja shares it all as India gear up for the 1⃣st #INDvAUS Test 👏 👏 - By @RajalArora
FULL INTERVIEW 🎥 🔽https://t.co/wLDodmTGQK pic.twitter.com/F2XtdSMpTv
आशिया कपपासून टीम इंडियात नाही
जाडेजा 2022 च्या आशिया कपमध्ये भारतीय संघासाठी शेवटचा सामना खेळला होता. स्पर्धेदरम्यान त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली, त्यानंतर त्याला पाच महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागले. यानंतर तो 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात खेळला गेलेला टी-20 विश्वचषकही खेळू शकला नाही.
दुखापतीपूर्वी रवींद्र जाडेजाचा फॉर्म
दुखापतग्रस्त होण्यापूर्वी रवींद्र जाडेजा (Jadeja) जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्यानं यावर्षी 9 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं. ज्यात 50.25 च्या सरासरीनं 201 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 141.54 इतका होता. तर, गोलंदाजीत जाडेजाला काही खास कामगिरी करता आली नाही. या सामन्यात त्याला फक्त 5 विकेट्स घेता आल्या आहेत.
हे देखील वाचा -