IND vs SA : टी 20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात दाखल, 9 जून रोजी पहिला सामना
South Africa tour of India 2022 : आयपीएलनंतर आता भारतीय संघ आंतरराष्ट्रीय टी 20 सामने खेळण्यासाठी सज्ज झालाय.
South Africa tour of India 2022 : आयपीएलनंतर आता भारतीय संघ आंतरराष्ट्रीय टी 20 सामने खेळण्यासाठी सज्ज झालाय. 9 जूनपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये पाच सामन्याच्या टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ नवी दिल्लीमध्ये (Delhi Airport) पोहचलाय. मायदेशात होणाऱ्या टी 20 मालिकेसाठी भारताच्या सिनिअर खेळाडूंना आराम देण्यात आलाय. युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ निवडण्यात आलाय. या संघाची धुरा केएल राहुलच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
भारतीय संघाला मोठा विक्रम करण्याची संधी -
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी 20 सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाला मोठा विक्रम करण्याची संधी आहे. भारतीय संघाने याआधी लागोपाठ 12 टी 20 सामने जिंकले आहेत. सर्वाधिक लागोपाठ टी 20 सामने जिंकण्यात भारतीय संघ संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाने अफगानिस्तान आणि रोमानिया देशाची बरोबरी केली आहे. आता दक्षिण आफ्रिकाविरोधात पहिला टी 20 सामना जिंकत लागोपाठ 13 सामने जिंकण्याचा विश्व विक्रम भारतीय संघ करु शकतो. जर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकाविरोधात पहिला टी 20 सामना जिंकला, तर सलग 13 सामने जिंकणारा पहिला संघ होणार आहे.
Touchdown 🇮🇳#INDvSA #BePartOfIt pic.twitter.com/kT67xxubwN
— Cricket South Africa (@OfficialCSA) June 2, 2022
12 सामने कुणाविरोधात जिंकले -
अफगानिस्तान (1 सामना), स्कॉटलँड (1 सामना), नामीबिया (1 सामना), न्यूजीलंड (2 सामने), वेस्टविंडीज (3 सामने) आणि श्रीलंका (3 सामने)
Welcome to the #Proteas, Tristan Stubbs 🇿🇦💚#INDvSA #BePartOfIt pic.twitter.com/EJWx8agZKV
— Cricket South Africa (@OfficialCSA) June 1, 2022
भारत-दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेचं वेळापत्रक-
सामना | तारीख |
पहिला टी-20 सामना | 9 जून 2022 |
दुसरा टी-20 सामना | 12 जून 2022 |
तिसरा टी-20 सामना | 14 जून 2022 |
चौथा टी-20 सामना | 17 जून 2022 |
पाचवा टी-20 सामना | 19 जून 2022 |
दक्षिण आफ्रिकेचा दौरा
2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्यांदा दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी भारतात आला. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 2-0 च्या फरकानं मालिका जिंकली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा 2019 मध्ये भारतात आला. ही मालिका एक-एक बरोबरीनं सुटली
भारतीय टी20 संघ-
केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक.
दक्षिण आफ्रिकेचा संघ-
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अॅनरिक नोर्किया, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रासी वॅन डर डसन, मार्को जॅनसेन.