Ind vs Ban : टीम इंडियातून उपकर्णधार गिलचा पत्ता कट, बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर? जाणून घ्या कारण
India vs Bangladesh T20I series Shubman Gill Update : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी क्रिकेट मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.
Shubman Gill India vs Bangladesh T20I series : भारतीय क्रिकेट संघ आता दीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा मैदानात उतरणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध 2 कसोटी सामने आणि 3 टी-20 सामने खेळताना दिसणार आहे. दरम्यान, मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, टीम इंडियाचा उपकर्णधार शुभमन गिलला संघाबाहेर ठेवले जाऊ शकते.
शुभमन गिल का होणार संघाबाहेर?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाचा अनुभवी उपकर्णधार शुभमन गिलला बांगलादेशविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर विश्रांती दिली जाऊ शकते. बांगलादेशविरुद्धच्या टी-20 संघातून त्याला बाहेर ठेवले जाऊ शकते. बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली आहे.
शुभमन गिल का दिली विश्रांती?
रिपोर्टनुसार, शुबमन गिलला बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेत विश्रांती देण्यात येणार आहे, कारण शुभमन गिल झिम्बाब्वेनंतर श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. यानंतर तो दुलीप ट्रॉफी 2024 मध्येही खेळला आणि आता कसोटी मालिकेत खेळणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे व्यवस्थापन गिल यांना ब्रेक देऊ शकते. पीटीआयच्या एका बातमीनुसार, शुभमन गिलसह जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनाही विश्रांती दिली जाऊ शकते.
टीम इंडियाला बांगलादेशविरुद्ध 7 ऑक्टोबर (ग्वाल्हेर), 10 ऑक्टोबर (दिल्ली) आणि 13 ऑक्टोबर (हैदराबाद) सामने खेळायचे आहेत. तर, भारतीय संघ 16 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणार आहे. अशा स्थितीत संघातील महत्त्वाच्या खेळाडूंनी तंदुरुस्त राहणे गरजेचे आहे.
दुखापत होण्याचा धोका
टीम इंडियाचे खेळाडू जवळपास वर्षभर खेळतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर ते आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटही खेळतात. अशा स्थितीत विश्रांती न दिल्यास दुखापत होण्याचा धोका असतो. या गोष्टी लक्षात घेऊन बीसीसीआय वरिष्ठ खेळाडूंना ब्रेक देण्याचा विचार करत आहे. रोहित आणि विराट टी-20 वर्ल्ड कपनंतर श्रीलंका दौऱ्यावर गेले होते. झिम्बाब्वे दौऱ्यावर ते टीम इंडियासोबत नव्हते. या दोघांनीही टी-20 मधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे त्यांना विश्रांती मिळेल.
शुभमन गिल हा तिन्ही फॉरमॅटमध्ये उपकर्णधार
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी टीम इंडियाची कमान हाती घेतल्यानंतरच शुभमन गिलला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा उपकर्णधार बनवले आहे. टी-20 वर्ल्ड कप विजेतेपद पटकावल्यानंतर शुभमन गिलकडे झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघाची कमान सोपवण्यात आली होती. टीम इंडियाचा पुढचा कर्णधार म्हणूनही त्याच्याकडे पाहिले जात आहे.
हे ही वाचा -