Virat Kohli : विराट कोहलीच्या फॉर्मवर प्रश्न, शिवम दुबेनं लाखमोलाचं उत्तर देत मनं जिंकली, म्हणाला...
Virat Kohli : टीम इंडियाचा सलामीवीर विराट कोहली यावेळी दमदार कामगिरी करु शकला नाही. टी20 वर्ल्ड कपमध्ये 3 डावात त्यानं 5 धावा केल्या आहेत.
न्यूयॉर्क : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला (Virat Kohli) टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) सूर गवसलेला नाही. विराट कोहलीनं तीन मॅचमध्ये 5 धावा केल्या आहेत. विराटच्या या कामगिरीमुळं त्याच्यावर टीका होऊ लागली होती. टीम इंडियाचा युवा खेळाडू शिवम दुबेला विराट कोहलीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. शिवम दुबेनं कोहलीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला एका वाक्यात उत्तर दिलं आणि सर्वांचं मनं जिंकली.
शिवम दुबेनं म्हटलं की विराट कोहली आगामी सामन्यांमध्ये फॉर्ममध्ये परत येईल. कोहलीला त्याच्या टीकाकारांना गप्प करायला वेळ लागणार नाही. विराटला जे बोलायचं आहे तो त्याच्या फलंदाजीच्या माध्यमातून दाखवून देईल, असं शिवम दुबे म्हणाला.
विराट कोहलीनं टी20 वर्ल्ड कपमध्ये यावेळी भारताच्या डावाची सुरुवात केली आहे. आयरलँड, अमेरिका आणि पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये विराट कोहलीला सूर गवसलेला नाही.कोहलीनं केवळ 5 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये धमाकेदार फलंदाजी करणाऱ्या विराटला सूर न गवसल्यानं चाहत्याचं टेन्शन वाढलंय. तर, विराट कोहलीला सलामी पाठवण्याऐवजी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवावं, असं मत देखील मांडलं जात आहे.
विराट कोहलीनं आयपीएल 2024 मध्ये दमदार कामगिरी केली होती. विराचनं 15 मॅचमध्ये 741 धावा करत ऑरेंज कॅप मिळवली होती. भारताकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल डावाची सुरुवात करतील, अशी आशा असताना विराटला संधी देण्यात आली आहे. न्यूयॉर्कमध्ये विराटला अपयश आलं असलं तरी फ्लोरिडा आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या मॅचेसमध्ये विराटला सूर गवसेल, अशी आशा चाहत्यांना आहे.
शिवम दुबेला विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. शिवम दुबे म्हणाला, विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल बोलणारा मी कोण आहे. जर विराटनं तीन मॅचमध्ये धावा केल्या नाहीत तर येत्या तीन मॅचेसमध्ये तीन शतकं करु शकतो. विराट कोहलीबाबत कोणी चर्चा करणा नाही, असं शिवम दुबे म्हणाला. विराट कोहलीनं 2014 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या.
टीम इंडिया सुपर 8 मध्ये
भारतानं ग्रुप स्टेजमधील चार पैकी तीन मॅच जिंकत सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. भारतानं पहिल्यांदा आयरलँडला पराभूत केलं. त्यानंतर पाकिस्तानला 6 धावांनी पराभूत केलं. अमेरिकेला विजय मिळवत भारतानं सुपर 8 मध्ये प्रवेश केला. भारताचा ग्रुप स्टेजमधील एक सामना कॅनडा विरुद्ध होणार आहे. त्यानंतर तीन सामने सुपर 8 च्या लढतींमध्ये होतील. त्यात भारतासमोर ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान यांचं आव्हान असेल. त्या सामन्यात विराट कोहलीच्या चांगल्या फलंदाजीची संघासह त्याच्या चाहत्यांना अपेक्षा आहे.
संबंधित बातम्या :
T 20 World Cup 2024 :सुपर 8 मध्ये भारताविरुद्ध कोण भिडणार? दोन संघ ठरले, तिसऱ्याबाबत सस्पेन्स कायम