T 20 World Cup 2024 :सुपर 8 मध्ये भारताविरुद्ध कोण भिडणार? दोन संघ ठरले, तिसऱ्याबाबत सस्पेन्स कायम
T20 World Cup 2024 : भारतानं टी 20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. सुपर 8 मध्ये भारतीय संघ तीन मॅच खेळणार आहे.
न्यूयॉर्क : भारतानं यदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) दमदार कामगिरी केली आहे. ग्रुप स्टेजमध्ये भारतानं (Team India) आतापर्यंत तीन मॅचेस जिंकल्या आहेत. अमेरिेकेला पराभूत करत भारतानं सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. त्यापूर्वी भारतानं आयरलँड आणि पाकिस्तानला पराभूत केलं. ग्रुप स्टेजमधील मॅच अंतिम टप्प्यात असताना सर्वांना सुपर 8 चे वेध लागले आहेत. भारताचे सुपर 8 मधील सामने 20 जून,22 जून आणि 24 जूनला होणार आहेत. भारताविरोधात सुपर 8 मध्ये कोण लढणार हे देखील निश्चित झालं आहे. भारत, अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेनं आतापर्यंत सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे.
भारत सुपर 8 मध्ये कुणा विरोधात लढणार?
सुपर 8 मधील भारताची पहिली मॅच 20 जूनला होणार आहे. टीम इंडियाच्या सुपर 8 मधील लढती देखील भारतीय प्रमाण वेळेनुसार ही मॅच सायंकाळी 8 वाजता सुरु होतील. भारताची ही मॅच क गटातील पहिल्या स्थानावर असलेल्या संघासोबत होईल. सध्या क गटात पहिल्या स्थानावर अफगाणिस्तान आहे. भारत विरुद्ध अफगाणिस्तान मॅच झाल्यास ती बारबाडोसमध्ये होईल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढत देखील निश्चित झाली आहे. ही मॅच 24 जूनला होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मॅच सेंट लूसियामध्ये होईल.
भारताविरुद्ध सुपर 8 मध्ये तिसरा संघ कोणता असेल?
भारत आणि गट ड मधील दुसऱ्या स्थानावरील संघ 22 जूनला आमने सामने येणार आहेत. ही मॅच अँटिग्वा मध्ये पार पडणार आहे. ड गटात दक्षिण आफ्रिका पहिल्या स्थानावर आहे. ड गटातील दुसऱ्या स्थानासाठी बांगलादेश आणि नेदरलँड यांच्यात स्पर्धा सुरु आहे. त्यामुळं या दोन्ही संघातील एक संघ भारताविरुद्ध लढेल.
भारत आणि कॅनडा यांच्यातील ग्रुप स्टेजमधील एक मॅच शिल्लक आहे. ही मॅच फ्लोरिडामध्ये होणार आहे. मात्र, पावसामुळं आणि पूरस्थितीमुळं ही मॅच होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
विराट कोहली कमबॅक करणार?
टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू आणि सलामीवीर विराट कोहली पहिल्या तीन मॅचेसमध्ये अपेक्षेप्रमाणं कामगिरी करु शकलेला नाही. सुपर 8 मॅचमध्ये विराट कोहलीची कामगिरी भारतासाठी महत्त्वाची आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करत आहेत. मात्र, या जोडीला डावाची सुरुवात दमदार करण्यात यश आलेलं नाही.
संबंधित बातम्या :
Saurabh Netravalkar: सौरभ नेत्रावळकरच्या वर्क फ्रॉम हॉटेलची गोष्ट, मुंबईकर खेळाडूची बहीण म्हणाली...