Shahid Afridi: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीला कोरोनाचा संसर्ग
पीसीबीच्या प्रोटोकॉलचे पालन करीत शाहीद आफ्रिदीनं स्वत:ला आयसोलेट केलंय आणि कोरोनाचा अहवाल नकारात्मक आल्यानंतरच तो संघात सामील होणार आहे.
![Shahid Afridi: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीला कोरोनाचा संसर्ग PSL 2022: Former Pakistan captain Shahid Afridi tests positive for Covid-19 Shahid Afridi: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीला कोरोनाचा संसर्ग](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/18/ead6e390518cfcf43a3c8e55e818fb5c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
PSL 2022: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आलीय. यामुळं पाकिस्तान सुपर लीगमधील क्वेटा ग्लॅडिएटर्सच्या संघाला मोठा धक्का बसलाय. शाहीद आफ्रिदी क्वेटा ग्लॅडिएटर्सचे प्रतिनिधित्व करत आहे. परंतु, कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं तो सुरुवतीच्या सामन्यांना मुकणार आहे. लाहोरविरुद्धच्या सामन्यातून तो संघात पुनारागमन करण्याची शक्यता आहे.
पीसीबीच्या प्रोटोकॉलचे पालन करीत शाहीद आफ्रिदीनं स्वत:ला आयसोलेट केलंय आणि कोरोनाचा अहवाल नकारात्मक आल्यानंतरच तो संघात सामील होणार आहे. त्यानं वैयक्तिक आणि आरोग्याच्या समस्यांमुळं पीएसएल 7 चं बायो बबल सोडलंय. क्वारंटाईनाचा कालावधी पूर्ण केल्यानंतरच संघात परतणार असल्याचं शाहिद आफ्रिदीनं म्हटलंय.
शाहीद आफ्रिदीचं ट्वीट-
सूत्रांनी जिओ न्यूजला सांगितले की, शाहिद आफ्रिदीने वैयक्तिक आणि आरोग्याच्या समस्यांमुळे बायो-बबलमधून माघार घेतल्याबद्दल फ्रेंचायझी व्यवस्थापनाला माफी मागितली. आफ्रिदीनं व्यवस्थापनाला सांगितले की त्याला पाठदुखीचा त्रास होत आहे आणि त्याच्या पत्नीच्या एका नातेवाईकाचे निधन झाले आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. कराचीतील नॅशनल स्टेडियमवर शुक्रवारपासून सुरू होणारी यंदाची पीएसएल ही आफ्रिदीची शेवटची स्पर्धा असणार आहे.
- हे देखील वाचा-
- IND vs WI: भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी वेस्ट इंडीजचा संघ जाहीर; कोणत्या खेळाडूंना मिळाली संधी
- Charanjit Singh Death: भारतीय हॉकी संघाचे महान खेळाडू चरणजीत सिंह यांचं निधन
- IPL Auction : आयपीएलच्या लिलावात यंदा श्रीसंतवर लागणार बोली, ऑक्शनसाठी केलं रजिस्ट्रेशन
- IND vs WI: जाडेजाला संघात स्थान का नाही? बीसीसीआयनं सांगितलं कारण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)