चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सिलेक्शन, पण रणजीत पुरते ढेपाळले, भारताचे 'हे' तीन बडे शिलेदार ज्यांना निडवून BCCI करतंय घोडचूक?
पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सर्व देशांनी तयारी सुरू केली आहे.
Champions Trophy selected Mumbai players in Ranji Trophy : पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सर्व देशांनी तयारी सुरू केली आहे. 2024 मध्ये टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारताने आणखी एक आयसीसी ट्रॉफी जिंकण्याच्या इराद्याने एक तगड्या संघाची घोषणा केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा होऊन जवळजवळ एक आठवडा झाला आहे. या संघाच्या घोषणेनंतर अनेक भारतीय क्रिकेटपटू रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसत आहेत. पण, यापैकी काही खेळाडूंची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडलेल्या तीन दिग्गजांनी रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी खराब कामगिरी केली होती. ज्यामुळे मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला.
10 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर परतला पण ठरला फेल
10 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करणारा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने फॉर्म परत मिळवण्याचा प्रयत्न करत होता. पण, त्याला मोठे अपयश आले नाही. पहिल्या डावात रोहित फक्त तीन धावा काढून झेलबाद झाला. दुसऱ्या डावात रोहितने त्याच्या खेळण्याच्या शैलीत बदल केला आणि सुरुवातीपासूनच आक्रमक खेळला, त्यात तो काही प्रमाणात यशस्वीही ठरला. पण, असे असूनही तो 35 चेंडूत 28 धावा करून बाद झाला. रोहितने त्याच्या खेळीत दोन चौकार आणि तीन षटकार मारले.
यशस्वी जैस्वाल
डावखुरा सलामीवीर यशस्वी जौस्वालची चॅम्पियन्स ट्रॉफी संघात बॅकअप ओपनर म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यालाही स्पर्धेत काही सामने खेळण्याची संधी मिळेल अशी आशा आहे. पण, याआधी रणजी ट्रॉफीमध्ये त्याची कामगिरी खूपच खराब होती. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये जम्मू आणि काश्मीरविरुद्ध खेळताना जैस्वाल दोन्ही डावात अपयशी ठरला. पहिल्या डावात त्याला आठ चेंडूत फक्त चार धावा करता आल्या. दुसऱ्या डावात त्याने चांगली सुरुवात केली पण तो फक्त 26 धावांवर बाद झाला. दोन्ही डाव एकत्रित करून, जैस्वालने या सामन्यात फक्त 30 धावा केल्या.
श्रेयस अय्यर
देशांतर्गत क्रिकेटमध्ये सतत आपल्या बॅटने कहर करणार श्रेयस अय्यरने या सामन्यात सर्वात जास्त खराब कामगिरी केली. श्रेयसची बॅट देशांतर्गत क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करत होती, पण या सामन्यात तो दोन्ही डावात तो काही विशेष करू शकला नाही. पहिल्या डावात श्रेयस सात चेंडूत 11 धावा काढून आऊट झाला. यादरम्यान त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला. दुसऱ्या डावात त्याने 16 चेंडूत 17 धावा केल्या. या काळात त्याच्या बॅटमधून चार चौकारही आले.
हे ही वाचा -