Rohit Sharma Mumbai Indians : 8 जानेवारी 2011... 12 वाजून 21 मिनिट! 'हा' तोच दिवस होता जेव्हा अंबानींना सापडला 5 ट्रॉफी जिंकून देणारा हिरो, पाहा VIDEO
इंडियन प्रीमियर लीगचा (IPL ) पुढील हंगाम सुरू होण्यास आता सुमारे दोन महिने उरले आहेत.
Rohit Sharma Mumbai Indians IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीगचा (IPL ) पुढील हंगाम सुरू होण्यास आता सुमारे दोन महिने उरले आहेत. 14 मार्चपासून आयपीएल 2025 सुरू होणार आहे. अलीकडेच आयपीएल 2025 साठी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे लिलाव पार पडला. ज्यामध्ये अनेक स्टार खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला. आयपीएल 2025 च्या लिलावात एकूण 577 खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता, 367 भारतीय आणि 210 परदेशी खेळाडूंचा समावेश होता. जामध्ये एकूण 182 खेळाडू खरेदी करण्यात आले होते. क्रिकेटच्या इतिहासातील या सर्वात मोठ्या लिलावात सर्व आयपीएल संघ त्यांच्या टीममध्ये उत्कृष्ट फॉर्मात असलेल्या खेळाडूंचा समावेश केला.
दरम्यान, आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फ्रँचायझी असलेल्या मुंबई इंडियन्सने आपला जुना कर्णधार रोहित शर्मासाठी खास पोस्ट केली आहे. लिलावात रोहितला फ्रँचायझीने पहिल्यांदा विकत घेतले. रोहितच्या एमआयमध्ये 14 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
मुंबई इंडियन्सने त्यांच्या एक्स हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये 8 जानेवारी 2011 ही तारीख आणि 12 वाजून 21 मिनिट दिसत आहे, जेव्हा मुंबईने रोहितसाठी बोली लावली होती आणि त्याला 2 मिलियन डॉलर्समध्ये खरेदी करण्यात आले होते. आज या घटनेला 14 वर्षे पूर्ण झाली आहेत. व्हिडिओमध्ये रोहित शर्मा कधी फलंदाजी करताना तर कधी फोटोशूट करताना दिसत आहे.
✅ 𝗙𝗢𝗨𝗥𝗧𝗘𝗘𝗡 years in 𝐁𝐋𝐔𝐄 & 𝐆𝐎𝐋𝐃 ✨#MumbaiMeriJaan #MumbaiIndians pic.twitter.com/dJoOlaYUVs
— Mumbai Indians (@mipaltan) January 8, 2025
रोहित शर्माने डेक्कन चार्जर्समधून आयपीएलमध्ये पदार्पण केले. 2010 पर्यंत तो या संघाचा भाग होता. त्यानंतर 2011 पासून ते आतापर्यंत तो मुंबई संघात आहे. 2013 मध्ये, रोहित मुंबईचा कर्णधार झाला आणि कर्णधार म्हणून पहिल्याच सत्रात त्याने संघाला ट्रॉफी जिंकून दिली. यानंतर त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्येही विजेतेपद पटकावले.
रोहित शर्मा आयपीएल 2023 पर्यंत मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता. तर आयपीएल 2024 साठी संघाने हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले. मात्र, या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी अत्यंत खराब होती, त्यांना 14 पैकी केवळ 4 सामने जिंकता आले आणि गुणतालिकेत ते तळाशी राहिले. हार्दिकलाही प्रेक्षकांनी कर्णधार म्हणून स्वीकारले नाही.
हे ही वाचा -