अभिनेता अजित कुमारचा भीषण अपघात, दुर्घटनेनंतर व्हायरल होणारा गाडीच्या आतला 'तो' VIDEO खरा?
Ajith Kumar Accident : साऊथ अभिनेता अजित कुमारचा रेसिंग करताना भीषण अपघात झाला असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Ajith Kumar Racing Accident Viral Video : दाक्षिणात्य अभिनेता अजित कुमार याचा रेसिंग करताना भीषण अपघात झाला आहे. रेसिंग सर्किटमध्ये सराव करताना भीषण अपघात झाला. या अपघातात कारचा चक्काचूर झाला. 180 च्या स्पीडने अजित कुमार रेसिंग करत असताना त्याचं कारवरचं नियंत्रण सुटलं आणि कार बॅरिकेटला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, त्यानंतर कार गोल-गोल फिरत राहिली. अजित कुमारच्या कार क्रॅशचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून हा अपघात किती भीषण होता, याचा अंदाज येईल. दरम्यान, यासोबत अजित कुमारचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ गाडीच्या आतील असल्याचं दिसत आहे.
अभिनेता अजित कुमारचा भीषण अपघात
अजित कुमारच्या अपघाताचा रेसिंग ट्र्रॅकवरील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासोबत अजितचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो गाडीच्या आतमध्ये असल्याचं दिसत असून जोरदार धडकेनंतर गाडी गोलांट्या खाताना दिसत आहे. गाडीच्या आतमधील हा व्हिडीओ अजित कुमारच्या रेसिंग ट्रॅकवरील अपघाताचा असल्याचं बोललं जात आहे. मात्र, या अफवा आहेत. अजित कुमारचा गाडीच्या आतमधील अपघाताचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ खोटा आहे. तो रेसिंग ट्रॅकवरील अपघाताचा व्हिडीओ नसून चित्रपटातील क्लिप आहे.
दुर्घटनेनंतर गाडीच्या आतील 'तो' VIDEO व्हायरल
अजित कुमारच्या अपघाताचा सोशल मीडियावर व्हायरल होणार इनसाईट व्हिडीओ हा चित्रपटाच्या शुटिंगदरम्यानचा आहे. अभिनेता अजित कुमारने विदामुयार्ची' (VidaaMuyarchi) चित्रपटासाठी अझरबैजानमध्ये 2023 वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये शूटिंग करत केलं होतं. यावेळी अजित कुमारच्या अपघाताचा सीन शूट करण्यात आला होता. ज्यामध्ये तो दुसऱ्या अभिनेत्यासोबत गाडीमध्ये बसल्याचं दिसत असून त्यानंतर गाडीचा अपघात होतो, असं दाखवण्यात आलं होतं. या सीनचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे.
अजित कुमारचा जुना व्हिडीओ व्हायरल
View this post on Instagram
व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय?
व्हायरल व्हिडीओमध्ये अजित कुमार कार चालवताना दिसत आहे. अभिनेत्याचं कारवरील नियंत्रण सुटतं आणि कार रस्त्याच्या कडेला घसरते. यावेळी अभिनेता आरव गाडीमध्ये ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला बसल्याचं दिसत आहे. आरव हात बांधलेल्या आणि गळ्यात टेप लावलेल्या स्थितीमध्ये बसला होता. गाडी स्लीप झाली आणि रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातानंतर सर्व टीम धावली आणि त्यांनी गाडीतून दोन्ही अभिनेत्यांना सुखरुप बाहेर काढलं.
अजित कुमारच्या आता घडलेल्या अपघातानंतर अभिनेत्याचा शूटिंग वेळेच्या हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पाहा अपघाताचा खरा व्हिडीओ
Ajith Kumar suffered a massive crash during practice, but miraculously, he walked away unscathed.
— C B Sharath (@sharath_cb) January 7, 2025
Another day in the office… that’s racing!!!#ajithkumarracing #ajithkumar pic.twitter.com/TozCfSXhsD
महत्त्वाच्या इतर बातम्या :