Asia Cup 2022 : शाहीन आफ्रिदीच्याजागी खेळण्यासाठी दोन नावांची चर्चा, मोहम्मद आमिरनंतर या अनुभवी खेळाडूचंही नाव समोर
Shaheed Afridi : पाकिस्तान संघाचा हुकूमी एक्का शाहीन आफ्रिदी दुखापतीमुळे यंदाच्या आशिया कपला हुकणार असून त्याच्याजागी नेमकी कोणाला संधी मिळणार हे अजूनही अस्पष्ट आहे.
![Asia Cup 2022 : शाहीन आफ्रिदीच्याजागी खेळण्यासाठी दोन नावांची चर्चा, मोहम्मद आमिरनंतर या अनुभवी खेळाडूचंही नाव समोर Mohammad aamir or wahab riaz may play in place of Shaheen Afridi is pakistan team for asia cup 2022 Asia Cup 2022 : शाहीन आफ्रिदीच्याजागी खेळण्यासाठी दोन नावांची चर्चा, मोहम्मद आमिरनंतर या अनुभवी खेळाडूचंही नाव समोर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/21/914fca1bd3a3fe7e8775699ba11c79dd1661104431701323_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shaheen Afridi Replacement : पाकिस्तान संघातील आघाडीचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaeen Afridi) दुखापतीमुळे आशिया चषक 2022 मध्ये पाकिस्तान संघाचा भाग नसणार असल्याचं काही दिवसांपूर्वीच समोर आलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) देखील याबाबत अधिकृत वक्तव्य केला आहे. शाहीन आफ्रिदीला श्रीलंका दौऱ्यात दुखापत झाली होती, मात्र तो आशिया कपसाठी तंदुरुस्त होईल, असे मानले जात होते. दरम्यान तो अजूनही दुखापतीतून सावरला नसल्याने शाहीन आफ्रिदीच्या जागी आशिया कपमध्ये कोणाला संधी मिळेल याबाबत अनेक चर्चा होत आहे. मोहम्मद आमिरला (Mohammad aamir) संधी मिळू शकते, असे मानले जात असताना आणखी एक नाव आता समोर आले आहे.
हे नाव म्हणजे संघातील अनुभवी गोलंदाज वहाब रियाझ (Wahab Riaz). वहाब रियाझ याने डिसेंबर 2020 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर अजून तो मैदानावर उतरला नसल्याने त्याला संधी मिळण्याबाबत सांशकता व्यक्त केली जात आहे.
'वसीम अक्रमलाही स्वत:ला सिद्ध करावं लागलं होतं.'
वहाब रियाझच्या पुनरागमनाच्या वृत्ताबाबत बोलताना पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट्टने मोठे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की, वसिम अक्रमसारख्या महान खेळाडूलाही पुनरागमन करण्यासाठी स्वत:ला सिद्ध करावे लागेल. यावलेळी, त्याने एक जुना किस्सा सांगत वसीम अक्रम सारख्या खेळाडूने स्वतःला कसे सिद्ध केले, हे सांगितले. हे उदाहरण देत वहाबलाही स्वत:ला सिद्ध करणं गरजेचं असल्याचं त्याने म्हटलं आहे.
आशिया कपसाठी पाकिस्तान संघ
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, शाहनवाज दहनी, उस्मान कादिर. (शाहीनची रिप्लेसमेंट अजून जाहीर झालेली नाही)
कधी, कुठं रंगणार भारत-पाकिस्तान सामना?
आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान 28 ऑगस्टला आमने-सामने येणार आहे. हा सामना दुबईत खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील ग्रुप सामन्यानंतर सुपर फोर सामने खेळले जाणार आहेत. त्यानंतर अंतिम सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील अंतिम सामनाही दुबईत 11 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)