Deepak Hooda: दिपक हुडा टीम इंडियासाठी ठरतोय लकी! सलग 16 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतानं मिळवलाय विजय
ZIM vs IND: शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि संजू सॅमसनच्या (Sanju Samson) दमदार प्रदर्शनाच्या जोरावर भारतानं दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेचा पाच विकेट्सनं (ZIM vs IND) पराभव केला.
India tour of Zimbabwe: शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि संजू सॅमसनच्या (Sanju Samson) दमदार प्रदर्शनाच्या जोरावर भारतानं दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेचा पाच विकेट्सनं (ZIM vs IND) पराभव केला. या विजयासह भारतानं मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या झिम्बाब्वेचा संघ 161 धावांवर गारद झाला. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतानं पाच विकेट्सनं हा सामना जिंकला. या विजयात भारतीय फलंदाजांनीही चांगलं योगदान दिलं. भारताची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार केएल राहुल अवघ्या 1 धावा करून बाद झाला. यानंतर धवन (33 धावा) आणि शुभमन गिल (33 धावा) यांनी धावा केल्या. इशान किशनही स्वस्तात बाद झाला. त्यानंतर संजू आणि दीपकनं डाव सांभाळला आणि पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.
झिम्बाब्वेविरुद्धच्या सलग दुसऱ्या विजयासह दीपक हुडानं विश्वविक्रमही आपल्या नावावर केलाय. या वर्षाच्या सुरुवातीला दीपकला पहिल्यांदा भारतत स्थान मिळालं. तेव्हापासून तो सातत्यानं चांगली कामगिरी करत आहे. दीपक हुड्डा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून 16 आंतरराष्ट्रीय सामने खेळला. ज्यात 9 टी-20 आणि 7 एकदिवसीय सामन्यांचा समावेश आहे. हे सर्व सामने भारतानं जिंकले आहेत.
दिपक हुडाची विक्रमाला गवसणी
दीपक हुडाची आतापर्यंतची आंतरराष्ट्रीय कारकीर्द चांगली ठरलीय. त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून एकूण 16 सामने खेळले आहेत. ज्या सामन्यांमध्ये तो उपस्थित होता, ते सर्व सामने भारतानं जिंकले आहेत. यासह दीपक हुड्डानं रोमानियन क्रिकेटपटू सात्विक नादिगोतलाचा सलग 15 विजयांचा विक्रम मोडलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून सलग 16 सामने जिंकणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरलाय.
दिपक हुडाची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
क्रिकेट | सामने | डाव | धावा | सर्वोच्च धावसंख्या | सरासरी | स्ट्राईक रेट | शतक | अर्धशतक | चौकार | षटकार | झेल |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
एकदिवसीय | 7 | 5 | 140 | 33 | 35.00 | 86.95 | 0 | 0 | 10 | 1 | 3 |
टी-20 | 9 | 7 | 274 | 104 | 54.80 | 161.17 | 1 | 0 | 25 | 13 | 8 |
हे देखील वाचा-