Asia Cup 2022, Rohit Sharma : आशिया कपमध्ये कसं आहे हिटमॅन रोहित शर्माचं प्रदर्शन? वाचा आकडेवारी
Asia Cup 2022 : आशिया कप 2022 27 ऑगस्टपासून सुरु होत असून भारतीय संघाचा पहिलाच सामना 28 ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्ध असणार आहे. अशामध्ये कर्णधार रोहितची आतावरची कामगिरी कशी आहे हे पाहूया...
Rohit Sharma Record In Asia Cup: आशिया कप 2022 (Asia Cup 2022) सुरू होण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. भारत आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध सामन्याने स्पर्धेची सुरुवात करेल. यंदाच्या वर्षी भारताचा फॉर्म पाहता भारत सामना जिंकण्याचा मोठा दावेदार मानला जात आहे. अशामध्ये भारतीय संघाचं नेतृत्त्व हाती असणाऱ्या रोहित शर्माचा (Rohit Sharma) आशिया कपमधील रेकॉर्ड नेमका कसा आहे ते पाहूया...
या स्पर्धेच्या इतिहासात महान फलंदाज सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये रोहित शर्माचा नंबर लागतो. रोहित शर्माने आतापर्यंत आशिया कपमध्ये 27 सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने 42.04 च्या सरासरीने आणि 90 च्या स्ट्राईक रेटने 883 रन बनवले आहेत. यादरम्यान नाबाद 111 हा त्याचा सर्वाधिक स्कोर आहे. त्याने 7 वेळा 50 हून अधिक धावांचा आकडा पार केला आहे. दरम्यान सचिन तेंडुलकरने केलेल्या 971 धावानंतर रोहितच्या 883 धावांचा क्रमांक लागतो.
कर्णधार रोहित शर्माकडे रेकॉर्ड करण्याची संधी
त्याचबरोबर भारतीय कर्णधार रोहित शर्माला आशिया चषकात एक खास विक्रम करण्याची संधी आहे. यंदा रोहित शर्मा आशिया कपमध्ये 1 हजार धावा पूर्ण करू शकतो. तसेच भारतीय कर्णधार सचिन तेंडुलकरचा 973 धावांचा विक्रम मोडू शकतो. याशिवाय रोहित शर्मा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3500 धावांचा टप्पा गाठणारा पहिला फलंदाज बनू शकतो. सध्या न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. मार्टिनने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आतापर्यंत 3 हजार 497 धावा केल्या आहेत. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने या फॉरमॅटमध्ये आतापर्यंत 3 हजार 487 धावा केल्यामुळे तो काही धावाच मार्टीनच्या मागे असून यंदा हा रेकॉर्ड नक्कीच तोडेल.
27 ऑगस्टपासून सामन्यांना सुरुवात
आशिया चषकाला येत्या 27 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर, अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात खेळला जाणार आहे. दरम्यान, सुपर 4 साठी 6 सामने खेळवले जाणार आहेत. सुपर फोरचा पहिला सामना 3 सप्टेंबरला शारजहामध्ये होणार आहे. तर त्याचा शेवटचा सामना 9 सप्टेंबरला म्हणजे फायनलच्या दोन दिवस आधी होणार आहे. हा सामना दुबईत होणार आहे. सुपर फोरमधील पहिला सामना वगळता बाकीचे सर्व सामने दुबईत होणार आहेत.
आशिया चषकाचं संपूर्ण वेळापत्रक-
सामना | दिवस | दिनांक | संघ | ग्रुप | ठिकाण |
1 | शनिवार | 27 ऑगस्ट | अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका | बी | दुबई |
2 | रविवार | 28 ऑगस्ट | भारत विरुद्ध पाकिस्तान | ए | दुबई |
3 | मंगळवार | 30 ऑगस्ट | बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान | बी | शारजाह |
4 | बुधवार | 31 ऑगस्ट | भारत विरुद्ध पात्र संघ | ए | दुबई |
5 | गुरुवार | 1 सप्टेंबर | श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश | बी | दुबई |
6 | शुक्रवार | 2 सप्टेंबर | पाकिस्तान विरुद्ध पात्र संघ | ए | शारजाह |
7 | शनिवार | 3 सप्टेंबर | ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 | सुपर 4 | शारजाह |
8 | रविवार | 4 सप्टेंबर | ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 | सुपर 4 | दुबई |
9 | मंगळवार | 6 सप्टेंबर | ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 1 | सुपर 4 | दुबई |
10 | बुधवार | 7 सप्टेंबर | ग्रुप ए पात्र 2 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 | सुपर 4 | दुबई |
11 | गुरुवार | 8 सप्टेंबर | ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 | सुपर 4 | दुबई |
12 | शुक्रवार | 9 सप्टेंबर | ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 | सुपर 4 | दुबई |
13 | रविवार | 11 सप्टेंबर | सुपर 4 पात्र 1 विरुद्ध सुपर 4 पात्र 2 | सुपर 4 | दुबई |
हे देखील वाचा-