Rohit Sharma: मोठ्या विक्रमापासून कर्णधार रोहित शर्मा फक्त 6 षटकार दूर!
टी-20 मालिकेनंतर भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडशी तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका (Eng vs Ind) खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज लंडनच्या (London) केनिंग्टन ओव्हल मैदानावर (Kennington Oval) खेळला जाईल.
Rohit Sharma: टी-20 मालिकेनंतर भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडशी तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका (England vs India ODI Series) खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज लंडनच्या (London) केनिंग्टन ओव्हल मैदानावर (Kennington Oval) खेळला जाईल. टी-20 टी-20 मालिकेत इंग्लंडवर मात केल्यानंतर एकदिवसीय मालिकेतही भारतीय संघ तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न करेल. इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा आणखी एका विक्रमाला गवसणी घालण्याची शक्यता आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील 250 षटकारांचा टप्पा गाठण्यापासून रोहित शर्मा फक्त 5 षटकार दूर आहे.
रोहित शर्माची एकदिवसीय कारकीर्द
रोहित शर्मा आतापर्यंत 230 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यात 48. 60 च्या सरासरीनं आणि 89.01 च्या स्ट्राईक रेटनं 9 हजार 283 धावा केल्या आहेत. ज्यात 29 शतक आणि 44 अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम खेळी 264 धावा आहेत. या दरम्यान, त्याच्या बॅटीतून 245 षटकार निघाले आहेत आणि 250 षटकारांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला फक्त 5 षटकारांची आवश्यकता आहे. इंग्लंडविरुद्ध एखदिवसीय मालिकेत रोहित शर्मा 250 षटकारांचा टप्पा गाठू शकतो.
क्रिकेट | सामने | डाव | धावा | HS | सरासरी | BF | SR | 100s | 50s | 4s | 6s | Ct | St |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
कसोटी | 45 | 77 | 3137 | 212 | 46.13 | 5625 | 55.76 | 8 | 14 | 335 | 64 | 49 | 0 |
एकदिवसीय | 230 | 223 | 9283 | 264 | 48.60 | 10428 | 89.01 | 29 | 44 | 845 | 245 | 82 | 0 |
टी-20 | 128 | 120 | 3379 | 118 | 32.18 | 2420 | 139.62 | 4 | 26 | 303 | 157 | 52 | 0 |
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू कोण?
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीच्या नावावर आहे. आफ्रिदीनं त्याच्या एकदिवसीय क्रिकेटच्या कारकिर्दीत 398 सामन्यात 351 षटकार ठोकले आहेत. त्यानंतर वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेलचा क्रमांक लागतो. त्यानं 301 सामन्यात 331 षटकार मारले आहेत. या यादीत श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ सयसूर्याचंही नाव आहे. त्यानं 445 एकदिवसीय सामन्यात 270 षटकार मारले आहेत.
हे देखील वाचा-