Lance Klusener: झिम्बाब्वेचं पुढं कसं होणार? फलंदाजी प्रशिक्षक लान्स क्लुसनरचा राजीनामा; टी-20 विश्वचषकापूर्वी मोठा झटका
T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकाला येत्या 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. झिम्बाब्वेला या स्पर्धेतील पहिला सामना 17 ऑक्टोबर रोजी आयर्लंडविरुद्ध खेळायचा आहे.
T20 World Cup 2022: झिम्बाब्वे क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक लान्स क्लुसनर (Lance Klusener) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. झिम्बाब्वे क्रिकेटनं सहमती दर्शवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या माजी अष्टपैलू खेळाडू लान्स क्लुसरनं पद सोडण्याचा निर्णय घेतलाय. टी-20 विश्वचषकाच्या तोंडावर लान्स क्लुसनरचा फलंदाजी प्रशिक्षक पदाचा राजीनामा हा झिम्बाब्वेच्या संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकाला येत्या 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. झिम्बाब्वेला या स्पर्धेतील पहिला सामना 17 ऑक्टोबर रोजी आयर्लंडविरुद्ध खेळायचा आहे.
झिम्बाब्वे क्रिकेटने एक निवेदन जारी करून क्लुसनरच्या राजीनाम्याची माहिती दिली. क्लुसनर यावर्षी मार्चमध्ये झिम्बाब्वे संघाच्या फलंदाजी प्रशिक्षक पदाची जबाबदारी खांद्यावर घेतली होती. यापूर्वी 2016 आणि 2018 मध्येही त्यांची संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये झिम्बाब्वेला आयर्लंड, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंडसह ब गटात ठेवण्यात आलं आहे.
Lance Klusener has resigned from his post as the Zimbabwe batting coach just days before the start of #T20WorldCup 2022.
— ICC (@ICC) October 8, 2022
Details ⬇️https://t.co/kF0sfTPn2W
ट्वीट-
ऑस्ट्रेलियाच्या या प्रमुख शहरात रंगणार टी-20 विश्वचषक स्पर्धा
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल.
हे देखील वाचा-