एक्स्प्लोर

Ind vs SA, 1st Test : पहिल्या कसोटीत भारताला मोठा झटका, महत्त्वाचा गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत भारताच्या मुख्य गोलंदाजाला दुखापत झाल्यामुळे त्याला सुरु सामन्यातून बाहेर पडावं लागलं.

Team India : भारत (India) आणि दक्षिण आफ्रीका (South Africa) यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पायाच्या दुखापतीमुळे सामन्याबाहेर पडला आहे. तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरु असताना बुमराहने पहिल्याच षटकात एक विकेट घेतल्यानंतर काही ओव्हरनंतर त्याला दुखापतीमुळे सामन्याबाहेर पडावे लागले. त्यानंतर त्याच्या जागी क्षेत्ररक्षणासाठी श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) मैदानात उतरवण्यात आले. दरम्यान भारताचा मुख्य गोलंदाज बुमराहला दुखापत झाल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. त्यात तो बुमराह तिनही फॉर्मेटमध्ये भारताचा मुख्य गोलंदाज असल्याने त्याचं संघात नसणं भारतासाठी मोठं संकट आणू शकतं.

दुखापत होण्यापूर्वीच बुमराहने सामन्यात 5.5 ओव्हर गोलंदाजी करत 12 धावा देत एक महत्वाची आणि पहिली विकेटही मिळवली. त्यामुळे तो संपूर्ण मॅच खेळला असता तर आणखी विकेट घेऊ शकला असता तसंच आफ्रिकेचा संघ लवकर सर्वबाद झाला असता. दरम्यान पुढील सामन्यापर्यंत बुमराह ठिक न झाल्यास इशांत शर्माला त्याच्या जागी संधी मिळू शकते. 

आतापर्यंत सामना

आतापर्यंतच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 327 धावा केल्या. यावेळी भारताकडून सर्वाधिक धावा केएल राहुलने (KL Rahul) केली. त्याने अप्रतिम शतक झळकावत 123 धावा केल्या. तर मयांक अगरवालने 60 धावा केल्या. या दोघांनंतर अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) एका चिवट खेळीचं दर्शन घडवलं असून त्याने 102 चेंडूत 48 धावा केल्या आहेत. पण त्यानंतरचे सर्व फलंदाज बुमराह सोडता दुहेरी संख्याही गाठू शकले नाही. बुमराहने केवळ 14 धावा केल्या. तर ऋषभ पंत आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 8 धावा केल्या आहेत. तर आश्विन, ठाकूर आणि सिराज यांनी 4 धावा केल्या. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिका संघावर सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजांनी दबदबा काय ठेवला. पहिल्या षटकात बुमरहाने सलामीवीर एल्गारला एका धावेवर बाद केलं. त्यानंतर पुढील विकेटही लगेच गेले. पण कर्णधार बावुआ आणि डिकॉक यांनी एक चांगली भागिदारी करत धावसंख्या 100 च्या पुढे नेली. पण डिकॉक बाद होताच आणखी विकेट पडू लागले. कर्णधार बवुआही अर्धशतक करुन बाद झाला. त्यानेच सर्वाधिक 52 धावा केल्या. पण संपूर्ण संघ 197 धावाच करु शकल्याने भारताकडे 130 धावांची आघाडी कायम होती. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारताने काहीच ओव्हर खेळल्या पण तितक्यात भारताचा सलामीवीर मयांक 4 धावा करुन बाद झाल्याने दिवसअखेर भारत 146 धावांच्या आघाडीसह 16 वर एक बाद अशा स्थितीत आहे.  

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखलDevendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Embed widget