SA Vs IND ODI Series: एकदिवसीय मालिकेत केएल राहुलला मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता, रोहित शर्मासमोर मोठं आव्हान
SA Vs IND ODI Series: भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील तीन कसोटी सामन्याच्या मालिकेला 26 डिसेंबरपासून सुरुवात झालीय.
SA Vs IND ODI Series: भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील तीन कसोटी सामन्याच्या मालिकेला 26 डिसेंबरपासून सुरुवात झालीय. त्यानंतर 19 जानेवारीपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्याची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. एकदिवसीय मालिकेत भारताचा सलामीवीर केएल राहुलला (KL Rahul) मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) तंदुरुस्त नसल्यानं एकदिवसीय मालिकेचं नेतृत्व केएल राहुलकडं सोपवलं जाऊ शकतं.
दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापासून रोहित शर्माकडं एकदिवसीय आणि टी-20 संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलंय. मात्र, रोहित शर्मा त्याच्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. जर तो पूर्णपणे तंदुरुस्त नसेल, तर त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेतून वगळलं जाण्याची शक्यता आहे. या स्थितीत केएल राहुलकडं कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. सध्या केएल राहुल भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार आहे.
रोहितच्या दुखापतीमुळं एकदिवसीय मालिकेसाठी संघनिवडीला उशीर
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघनिवडीला उशीर होण्यामागे रोहित शर्माची दुखापत हेही एक कारण सांगितलं जातंय. रोहित शर्माच्या दुखापतीबाबत स्पष्टता नसल्यामुळं बीसीसीआयनं निवड समितीची बैठक पुढं ढकललीय. यापूर्वी ही बैठक विजय हजारे करंडक संपल्यानंतर होणार होती.
दुखापतीतून सावरण्यासाठी रोहितचे प्रयत्न सुरू
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, भारत दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यानंतर 30 किंवा 31 डिसेंबरला संघ निवडीसाठी बैठक होणार आहे. तसेच या बैठकीला अजून उशीर होण्याची शक्यता आहे. रोहित दुखापतीतून सावरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पण हॅमस्ट्रिंगची दुखापत इतर दुखापतींपेक्षा वेगळी आहे. एकदिवसीय संघाची निवड होईपर्यंत रोहित पूर्णपणे तंदुरुस्त नसू शकतो. पण तरीही मालिकेत 3 आठवड्यांचा कालावधी आहे. अशा परिस्थितीत रोहितकडे तंदुरुस्त होऊन संघात सामील होण्याचा पर्याय असेल.
आता बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 'पहिल्या कसोटीनंतर 30 किंवा 31 डिसेंबरला संघ निवडीसाठी बैठक होणार आहे. बीसीसीआय याला पुढेही नेऊ शकते. रोहित दुखापतीतून सावरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे पण हॅमस्ट्रिंगची दुखापत इतर दुखापतींपेक्षा वेगळी आहे. एकदिवसीय संघाची निवड होईपर्यंत रोहित पूर्णपणे तंदुरुस्त नसू शकतो. पण तरीही मालिकेत 3 आठवड्यांचा कालावधी आहे. अशा परिस्थितीत रोहितकडे तंदुरुस्त होऊन संघात सामील होण्याचा पर्याय असेल.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha