Taniya Bhatia: आता तर हद्दच झाली! लंडनच्या हॉटेल मॅरियटमधून तानिया भाटियाची बॅग चोरीला
Taniya Bhatia Jewellery Bag With Cash Stolen: इंग्लंडच्या संघाला त्यांच्याच मायभूमीवर तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत क्लीन स्वीप दिल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ मायदेशी परतलाय.
Taniya Bhatia Jewellery Bag With Cash Stolen: इंग्लंडच्या संघाला त्यांच्याच मायभूमीवर तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत क्लीन स्वीप दिल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ मायदेशी परतलाय. मायदेशी परतल्यानंतर संघाची यष्टिरक्षक फलंदाज तानिया भाटियानं केलेल्या ट्वीटनं क्रिडाविश्वात खळबळ माजलीय. इंग्लंड दौऱ्यावर गेलेला भारतीय महिला संघ मॅरियट हॉटेल लंडन येथे थांबला होता. परंतु, भारतीय संघाची यष्टीरक्षक तानिया भाटिया हिच्या हॉटेल खोलीतून तिची बॅग चोरीला गेल्याचं तिनं म्हटलंय. ज्यामध्ये रोख रक्कम, कार्ड, घड्याळं आणि दागिनं यांसारख्या अनेक मौल्यवान वस्तू होत्या.
तानियानं ट्विट करून लिहिलंय की, "मॅरियट हॉटेल लंडन यांच्या एकूणच व्यवस्थापनामूळे मला धक्का बसला आहे. तशीच मी नाराजही झालीय. कोणीतरी माझ्या रूममध्ये येतो आणि माझ्या बॅगमधील रोख रक्कम, कार्ड्स आणि माझे दागिने चोरून नेतो. मॅरिएट हॉटेल खूपच असुरक्षित आहे. आशा करते की, लवकरात लवकर या प्रकरणाची चौकशी होईल आणि यावर कारवाई केली जाईल. सुरक्षेची खूपच खराब व्यवस्था. इंग्लंड क्रिकेट बोर्ड पुढील काळात याबाबत काळजी घेईल."
ट्वीट-
Indian cricketer Taniyaa Sapna Bhatia tweets that her bag with cash, cards, watches & jewellery was stolen from her personal room during her stay at Marriot Hotel London. Also asks for quick investigation & resolution of the matter. pic.twitter.com/z4YGcRaE01
— ANI (@ANI) September 26, 2022
हॉटेल व्यवस्थापनाकडून चौकशी सुरू
दरम्यान, तानिया ज्या हॉटेलमध्ये थाबली होती, त्या हॉटेल व्यवस्थापनाकडून या प्रकरणी निवेदन जारी करण्यात आलंय. "नमस्कार तानिया, आम्हाला हे ऐकून वाईट वाटलं. कृपया आम्हाला तुझं नाव आणि ईमेल पत्ता आणि तू हॉटेलमध्ये थांबलेली अचूक तारीखची माहिती संदेशाद्वारे द्यावी, जेणेकरून आम्ही या प्रकरणाची अधिक चौकशी करू शकू."
आगामी आशिया चषकात तानिया भाटियाची भारतीय संघात
तानिया इंग्लंड दौऱ्यावर भारताच्या टी-20 आणि एकदिवसीय संघाचा भाग होती. मात्र, तिला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. दरम्यान, इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत रुचा घोषानं यष्टीरक्षण केलं. तर,यास्तिका भाटियाला एकदिवसीय मालिकेत संधी मिळाली.आगामी 2022 आशिया चषक स्पर्धेसाठी तानियाची भारतीय संघात राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आलीय.
हे देखील वाचा-