India A vs Australia A : टीम इंडियाला लागले ग्रहण... ऑस्ट्रेलियाकडून भारताला व्हाईटवॉश, बॉर्डर-गावसकर ट्रॉफीआधी मोठा धक्का
भारतीय संघाला कुठेतरी आता ग्रहण लागले आहे, असे दिसत आहे. अलीकडेच न्यूझीलंडने 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा 3-0 ने पराभव केला होता.
Australia A vs India A 2nd unofficial Test : भारतीय संघाला कुठेतरी आता ग्रहण लागले आहे, असे दिसत आहे. अलीकडेच न्यूझीलंडने 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा 3-0 ने पराभव केला होता. या पराभवामुळे भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा फटका बसला. टीम इंडियाला गुणतालिकेत अव्वल स्थान गमवावे लागले. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर टीम इंडियाला आता 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळायची आहे. या ट्रॉफी अंतर्गत 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल. या मालिकेला अजून काही टाईम असला तरी भारतीय अ संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
2ND Test. Australia A Won by 6 Wicket(s) https://t.co/ZbDFt8gVMr #AUSAvINDA
— BCCI (@BCCI) November 9, 2024
भारत अ संघाचा क्लीन स्वीप
खरंतर, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड म्हणजेच एमसीजी येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया अ संघाने भारत अ संघाचा 6 गडी राखून पराभव केला. भारताचा पहिला डाव 161 धावांवर आटोपला. ध्रुव जुरेल वगळता एकही फलंदाज चालला नाही. जुरेलने 80 धावांची खेळी खेळली. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या अ संघाने 223 धावा केल्या. दुसऱ्या डावात भारतीय संघाने थोडी चांगली कामगिरी केली पण ती अपुरी ठरली. यावेळीही ध्रुव जुरेलने सर्वाधिक 68 धावा केल्या. भारताने दुसऱ्या डावात 229 धावा करत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 168 धावांचे लक्ष्य दिले होते. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरुवातीला गडगडला पण नंतर सॅम कोन्स्टासच्या नाबाद 73 आणि ब्यू वेबस्टरच्या नाबाद 46 धावांच्या जोरावर सहा विकेट्स शिल्लक राहून लक्ष्य गाठले.
- AUS A beat IND A by 7 wickets in the first match.
— Johns. (@CricCrazyJohns) November 9, 2024
- AUS A beat IND A by 6 wickets in the second match.
Complete Dominance by Australia A against India A in the unofficial Test Series. 🏆 pic.twitter.com/hDXutV61pQ
अशा प्रकारे ऑस्ट्रेलिया अ संघाने 2 अनधिकृत सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा 2-0 असा व्हाईटवॉश केला. याआधी ऑस्ट्रेलियाने पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्यात भारताचा 7 विकेट्सने पराभव केला होता. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीपूर्वी भारत अ संघाच्या या पराभवामुळे टीम इंडियाची नक्कीच डोकेदुखी वाढली आहे.
हे ही वाचा