(Source: Poll of Polls)
Ind vs SA, 2nd Test : दक्षिण आफ्रिका पलटवार करणार की भारत इतिहास रचणार? उद्या रंगणार सामना
IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पार पडलेल्या पहिल्या कसोटीत भारताने विजय मिळवत मालिकेतही 1-0 ची आघाडी घेतली आहे. ज्यानंतर आता दुसरा सामना खेळवला जाणार आहे.
Ind vs SA, 2nd Test : दक्षिण आफ्रिकेच्या सेंच्युरियन मैदानात (Centurion) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs Sout Africa) यांच्यातील कसोटी सामन्यात भारातने 113 धावांनी विजय मिळवत इतिहास रचला. कारण कोणत्याही आशियाई संघाने सेन्चुरियन मैदानात आफ्रिकेला पहिल्यांदाच नमवलं आहे. ज्यानंतर आता जोहान्सबर्ग येथे दुसरा कसोटी सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवला जाणार असून या सामन्यात आफ्रिका जिंकून मालिकेत बरोबरी करेल का भारत सामना जिंकूत मालिका जिंकून इतिहास रचेल? हे पाहावे लागेल.
भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. ज्यातील पहिला कसोटी सामना भारताने जिंकला आहे. सामन्यात भारताकडून केएल राहुलचं शतक आणि मोहम्मद शमीच्या 8 विकेट्स महत्त्वपूर्ण ठरल्या. त्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात भारत कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. दुसरा सामना सोमवारी (3 जानेवारी) भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे.
भारताला इतिहास रचण्याची संधी
भारतीय क्रिकेट संघाने 90 च्या दशकात पहिली कसोटी मॅच दक्षिण आफ्रिकेत खेळली होती. तेव्हापासून आतापर्यंत भारताने एकही कसोटी मालिका आफ्रिकेत जिंकलेली नाही. पण सोमवारी सुरु होणारी कसोटी मॅच भारताने जिंकल्यास भारत तीन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 ने खिशात घालून इतिहास रचेल.
हे देखील वाचा-
- Team India Calendar : टी-20 विश्वचषक, आशिया चषक, 2022 मध्ये टीम इंडिया व्यस्त; पाहा वर्षभराचं वेळापत्रक
- ICC T20I Player of Year: आयसीसी टी20 प्लेयर ऑफ द इयरची नामांकनं जाहीर, मोहम्मद रिझवानसह तिघांची नावं
- Chetan Sharma on Kohli : विराट कोहलीला टी20 कर्णधारपद सोडायला सांगितलं नव्हतं, बीसीसीआयचं स्पष्टीकरण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha