Chetan Sharma on Kohli : विराट कोहलीला टी20 कर्णधारपद सोडायला सांगितलं नव्हतं, बीसीसीआयचं स्पष्टीकरण
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा यांनी विराट कोहली आणि बीसीसीआय यांच्यातील कथित वादाबद्दलचं स्पष्टीकरण दिलं आहे.
Indian Cricket Team : भारतीय कसोटी संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत विजय मिळवला असून आणखी दोन कसोटी सामने शिल्लक आहेत. दरम्यान यानंतर होणाऱ्या तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ नुकताच जाहीर केला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा यांनी संघ जाहीर केला. यावेळी शर्मा यांनी विराट कोहली आणि बीसीसीआय यांच्यातील कथित वादाबद्दलही स्पष्टीकरण दिलं. विराटला टी20 संघाचं कर्णधारपद सोडण्यापासून बीसीसीआयने थांबवण्याचा प्रयत्न केला होता, असं शर्मा यांनी स्पष्ट केलं.
टी20 विश्वचषकापूर्वी विराट कोहलीने टी20 संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर झाला असता एकदिवसीय संघाचं कर्णधारपदही टी20 प्रमाणे रोहित शर्माकडे नेतृत्व देण्यात आलं. ज्यानंतर पत्रकार परिषदेत विराटने बरेच मोठे खुलासे केले. यावेळी सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकदिसीय संघाचं कर्णधारपद माझ्याकडून काढून घेताना कोणतीच चर्चा झाली नव्हती. आफ्रिका दौऱ्यात कसोटी संघाच्या चर्चेबाबत फोन केला असता शेवटच्या पाच मिनिटांत तू वन-डेचा कर्णधार नसशील एवढं कळवण्यात आलं. दरम्यान या वक्तव्यानंतर विराट कोहली आणि बीसीसीआय असा एक कथित वाद जन्माला आला. ज्याबाबत आता बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा यांनी खुलासा केला आहे.
काय म्हणाले चेतन शर्मा?
विराट कोहलीने टी20 संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याचं सांगितलल्यानंतर बीसीसीआयकडून त्याला थांबवण्यात आलं होतं. त्याला या निर्णयावर विटार करण्यास सांगितले होते. पण त्याने ठाम निर्णय घेतल्यानंतर मर्यादीत षटकांमध्ये दोन कर्णधार नको म्हणून एकदिवसीय क्रिकेट संघाचं कर्णधारपदही रोहित शर्माकडेच सोपवण्यात आल्याचं चेतन शर्मा यांनी सांगितलं.
हे ही वाचा -
- India's ODI Squad Announced : राहुलकडे कर्णधारपद; दक्षिण आफ्रिकाविरोधातील एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची निवड
- U19 Asia Cup 2021 Final: सरत्या वर्षाचा शेवट गोड! भारतानं आठव्यांदा अंडर-19 आशिया चषकावर कोरलं नाव
- Team India : 14 सामने, 365 दिवस, 250 पेक्षा जास्त विकेट; कसोटीत भारतीय गोलंदाजांचा दबदबा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha