(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs SA 2nd Test: पावसामुळं चौथ्या दिवशीचा खेळ रद्द होण्याची शक्यता
भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यात जोहान्सबर्ग येथील वांडरर्स स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे.
IND vs SA 2nd Test: भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यात जोहान्सबर्ग येथील वांडरर्स स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. परंतु, चौथ्या दिवशीचा खेळ सुरु होण्यापूर्वीच पावसानं व्यत्यय आणलंय. जोहान्सबर्ग येथे सकाळपासून पाऊस सुरु असल्यानं आजचा सामना अजूनही सुरुच झाला नाही. यामुळं आजच्या दिवसाचा खेळ रद्द होण्याची शक्यता दर्शवली जातेय.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं पारडं जडं दिसत आहे. जोहान्सबर्ग कसोटीच्या तिसऱ्या दिवसाअखेरपर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 40 षटकांत 2 विकेट्स गमावून 118 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी केवळ 122 धावांची गरज आहे. यामुळं हा कसोटी सामना निर्णायक वळणावर आहे. चौथ्या दिवशीच सामन्याचा निकाल लागणार हे जवळपास स्पष्ट झाले असून आफ्रिका उर्वरित 122 धावा करणार की भारताचे गोलंदाज शिल्लक आठ विकेट्स घेऊन ऐतिहासिक मालिका विजयावर शिक्कामोर्तब करतील? हे पाहणे रंजक ठरेल.
भारताचा प्लेईंग इलेव्हन:
केएल राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन:
डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, कीगन पीटरसन, रॅसी व्हॅन डर डुसेन, टेम्बा बावुमा, काइल वेरेने (विकेटकीपर), मार्को जॅन्सन, कागिसो रबाडा, केशव महाराज, डुआन ऑलिव्हियर आणि लुंगी एनगिडी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-
- IND Vs SA: जोहान्सबर्ग कसोटीत दक्षिण आफ्रिकेचं पारडं जड, चौथ्या दिवसासाठी भारताचा गेम प्लॅन काय? चेतेश्वर पुजारा म्हणाला...
- ICC Womens World Cup 2022: विश्वचषकासाठी भारतीय महिला संघाची घोषणा, स्टार गोलंदाज शिखा पांडेला संघात स्थान नाही
- Djokovic Controversy : आधी विमानतळावर रोखलं, अन् मग... ; ऑस्ट्रेलियाकडून सर्वश्रेष्ठ टेनिसपटू नोवाक जोकोविचचा व्हिसा रद्द