एक्स्प्लोर

Djokovic Controversy : आधी विमानतळावर रोखलं, अन् मग... ; ऑस्ट्रेलियाकडून सर्वश्रेष्ठ टेनिसपटू नोवाक जोकोविचचा व्हिसा रद्द

Australian Open 2022 : वर्ल्ड नंबर वन टेनिसपटू नोवाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला होता. परंतु, त्याला ऑस्ट्रेलियाकडून विमानतळावरच रोखण्यात आलं.

Australian Open 2022 : जगातील अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू सर्बियाच्या नोवाक जोकोविच (Novak Djokovic) याचा व्हिसा ऑस्ट्रेलियानं रद्द केला आहे. ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी नोवाक जोकोविच मेलबर्नला पोहोचला. तत्पूर्वी जोकोविचला विमानतळावर काही तास थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर देशात प्रवेशासंबंधी आवश्यक कागदपत्रं सादर न केल्यामुळं त्यांचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे.

एका दिवसापूर्वी, नोवाक जोकोविचला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी होण्यासाठी ऑस्ट्रेलियानं मान्यता दिली होती. लसीकरण नियमांमध्ये सूट दिली होती. या प्रकरणी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन म्हणाले की, कायदा सर्वांसाठी समान आहे आणि कोणीही कायद्याच्या वर नाही. ऑस्ट्रेलियन सरकारच्या या निर्णयाला जोकोविच आव्हान देऊ शकतो, अशी माहिती मिळत आहे. 

जगातील अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोविचला प्रतिष्ठित ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया गाठावं लागणार आहे. अलिकडेच त्यांनं सांगितलं होतं की, वैद्यकीय कारणांमुळे त्यांनं कोविड-19 ची लस घेतलेली नाही. पण आता ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Scott Morrison) यांनी जोकोविचबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. जर जोकोविच वैद्यकीय कारणं सिद्ध करू शकला नाही, तर त्याला ऑस्ट्रेलियात प्रवेश दिला जाणार नाही, असं पंतप्रधान म्हणाले होते. यावरुन अनेक चर्चा रंगल्या होत्या.

जोकोविचनं आतापर्यंत कोरोनाची लस घेतलेली नाही. सर्वश्रेष्ठ टेनिस खेळाडू आणि 9 वेळा ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियाहून क्रोएशियाला रवाना होण्यापूर्वी सांगितलं होतं की, वैद्यकीय कारणांमुळे त्याला लसीपासून सूट देण्यात आली आहे. यापूर्वी, टेनिस ऑस्ट्रेलिया आणि व्हिक्टोरियन राज्य सरकारनं सांगितलं होतं की, जोकोविचसह आणखी 26 अर्जदारांनी लसीकरणाशिवाय ऑस्ट्रेलियात प्रवेश करण्यासाठी अर्ज केला होता.

ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या वक्तव्यानं हे प्रकरण चांगलंच तापलं आहे. जोकोविचसाठी कोणताही विशेष नियम नसल्याचं पंतप्रधानांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. जर ते सिद्ध करू शकत नसतील की, त्यांना वैद्यकीय कारणांमुळे सूट देण्यात आली आहे, तर त्यांना ऑस्ट्रेलियात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि पुढच्याच फ्लाइटनं त्यांना त्यांच्या देशात परत पाठवलं जाईल, असं ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं. सध्या या प्रकरणावरुन जगभरात चर्चा सुरू झाली आहे. किंबहुना, जोकोविचनेही गेल्या वर्षी लसीला विरोध केला होता. त्यामुळे हे प्रकरण सध्या चर्चेत आहे. 

दरम्यान, सध्या ऑस्ट्रेलियात कोविड -19 संसर्ग वेगाने पसरत आहे आणि सरकार त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर निर्बंध लादत आहे. सरकारचा प्रयत्न आहे की, बाहेरून फक्त तेच लोक देशात येऊ शकतील, ज्यांचे संपूर्ण लसीकरण झालं आहे. त्यामुळे 17 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या 'ऑस्ट्रेलियन ओपन'मध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना कोरोनाची लस घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. जे खेळाडू वैद्यकीय कारणांमुळे लस घेऊ शकले नाहीत, त्यांना या नियमातून सूट देण्यात येणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kareena Kapoor Karishma Kapoor : करिष्मा आणि करिना कपूर राजकारणाच्या आखाड्यात? दोन्ही अभिनेत्री वर्षा बंगल्यावर दाखल, चर्चांना उधाण
करिष्मा आणि करिना कपूर राजकारणाच्या आखाड्यात? दोन्ही अभिनेत्री वर्षा बंगल्यावर दाखल, चर्चांना उधाण
Shiv Sena : निगेटिव्ह सर्व्हेच्या नावावर शिंदेंच्या जागा भाजपकडून बळकण्याचं सत्र, मग विधानसभेचं काय? शिवसेनेचे आमदार नाराज
निगेटिव्ह सर्व्हेच्या नावावर शिंदेंच्या जागा भाजपकडून बळकण्याचं सत्र, मग विधानसभेचं काय? शिवसेनेचे आमदार नाराज
Kavya Maran: हसताना, रागवताना काव्या मारनला तुम्ही पाहिलं...पण तिचा डान्स बघितला का?, पाहा Video
हसताना, रागवताना काव्या मारनला तुम्ही पाहिलं...; पण तिचा डान्स बघितला का?, पाहा Video
Nashik Lok Sabha : उमेदवारी न मिळाल्याने विजय करंजकर नाराज, राजाभाऊ वाजेंनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करत घेतला मोठा निर्णय
उमेदवारी न मिळाल्याने विजय करंजकर नाराज, राजाभाऊ वाजेंनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करत घेतला मोठा निर्णय
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Govinda Ahuja to Join CM Eknath Shinde Shiv Sena : अभिनेता गोविंदा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणारShinde Group Loksabha Election 2024 : शिंदे गटाच्या 13 पैकी 12 खासदारांना पुन्हा संधी मिळणारSanjay Shirsat on Lok Sabha : शिंदेंच्या 12 खासदारांना पुन्हा संधी मिळणार? कुणाकुणाची नावं?Rashmi Barve :  जातवैधता प्रमाणपत्र संदर्भात रश्मी बर्वेंना तातडीचा दिलासा देण्यास नकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kareena Kapoor Karishma Kapoor : करिष्मा आणि करिना कपूर राजकारणाच्या आखाड्यात? दोन्ही अभिनेत्री वर्षा बंगल्यावर दाखल, चर्चांना उधाण
करिष्मा आणि करिना कपूर राजकारणाच्या आखाड्यात? दोन्ही अभिनेत्री वर्षा बंगल्यावर दाखल, चर्चांना उधाण
Shiv Sena : निगेटिव्ह सर्व्हेच्या नावावर शिंदेंच्या जागा भाजपकडून बळकण्याचं सत्र, मग विधानसभेचं काय? शिवसेनेचे आमदार नाराज
निगेटिव्ह सर्व्हेच्या नावावर शिंदेंच्या जागा भाजपकडून बळकण्याचं सत्र, मग विधानसभेचं काय? शिवसेनेचे आमदार नाराज
Kavya Maran: हसताना, रागवताना काव्या मारनला तुम्ही पाहिलं...पण तिचा डान्स बघितला का?, पाहा Video
हसताना, रागवताना काव्या मारनला तुम्ही पाहिलं...; पण तिचा डान्स बघितला का?, पाहा Video
Nashik Lok Sabha : उमेदवारी न मिळाल्याने विजय करंजकर नाराज, राजाभाऊ वाजेंनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करत घेतला मोठा निर्णय
उमेदवारी न मिळाल्याने विजय करंजकर नाराज, राजाभाऊ वाजेंनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करत घेतला मोठा निर्णय
Sanjay Shirsat on Lok Sabha : शिंदेंच्या 12 खासदारांना पुन्हा संधी मिळणार? कुणाकुणाची नावं?
शिंदेंच्या 12 खासदारांना पुन्हा संधी मिळणार? यादीत कुणाकुणाची नावं?
'पैसे घेऊन नाना पटोलेंकडून उमेदवारी दिली जातेय'; काँग्रेसच्या माजी आमदाराचा गंभीर आरोप
'पैसे घेऊन नाना पटोलेंकडून उमेदवारी दिली जातेय'; काँग्रेसच्या माजी आमदाराचा गंभीर आरोप
Arvind Kejriwal on ED : 'आप'ला ठेचणे, खंडणी रॅकेट तयार करणे हा ईडीचा हेतू; अरविंद फार्माने 55 कोटींचे निवडणूक रोखे भाजपला दिले; केजरीवालांचा गौप्यस्फोट
'आप'ला ठेचणे, खंडणी रॅकेट तयार करणे हा ईडीचा हेतू; अरविंद केजरीवालांचा ईडीवर गंभीर आरोप
RR Vs DC Dream11 prediction: जैस्वाल, बटलर, वॉर्नर, कोणाला बनवाल कर्णधार?; 11 खेळाडूंची परफेक्ट टीम, तुम्हाला करेल मालामाल
जैस्वाल, बटलर, वॉर्नर, कोणाला बनवाल कर्णधार?; 11 खेळाडूंची परफेक्ट टीम, तुम्हाला करेल मालामाल
Embed widget