ICC Womens World Cup 2022: विश्वचषकासाठी भारतीय महिला संघाची घोषणा, पहिल्याच सामन्यात पाकिस्तानशी भिडणार
World Cup 2022 Team India Squad: बीसीसीआयनं गुरुवारी 15 सदस्यीय संघाची घोषणा केलीय. मिताली राजकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आलंय. तर, हरमनप्रीत कौर उपकर्णधाराची जबाबादारी देण्यात आलीय.
World Cup 2022 Team India Squad: न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या महिला विश्वचषक 2022 साठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा (Women’s World Cup 2022) करण्यात आलीय. बीसीसीआयनं गुरुवारी 15 सदस्यीय संघाची घोषणा केलीय. मिताली राजकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आलंय. तर, हरमनप्रीत कौरकडं उपकर्णधाराची जबाबादारी देण्यात आलीय. वेगवान गोलंदाज शिखा पांडेला संघात स्थान मिळालेले नाही. भारतीय संघ विश्वचषकातील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. हा सामना 6 मार्च रोजी बे-ओव्हल तौरंगा येथे होणार आहे.
शिखा पांडे गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. तिनं ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हिलीला क्लीन बोल्ड केलं होतं. या चेंडूची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली होती. भारताचा माजी खेळाडू वसीम जाफरने तर या चेंडूला महिला क्रिकेटमधील बॉल ऑफ द सेन्चुरी असं म्हटलं होतं.
भारतीय महिला क्रिकेट संघाचं वेळापत्रक
1) भारत विरुद्द पाकिस्तान - 6 मार्च 2022
2) भारत विरुद्ध न्यूझीलंड- 10 मार्च 2022
3) भारत विरुद्ध वेस्ट इंडीज- 12 मार्च 2022
4) भारत विरुद्ध इंग्लंड- 16 मार्च 2022
5) भारत विरुद्ध ऑकलँड- 19 मार्च 2022
6) भारत विरुद्ध बांगलादेश- 22 मार्च 2022
7) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका- 27 मार्च 2022
भारतीय संघ-
मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृति मंधाना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, दीप्ति शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), स्नेह राणा, झूलन गोस्वामी, पूजा वस्त्रकार, मेघा सिंह, रेणुका सिंह ठाकुर, तानिया भाटिया (विकेटकीपर), राजेश्वर गायकवाड, पूनम यादव.
स्टँड बाय प्लेयर: एकता बिष्ट, सिमरन दिल बहादुर आणि साभीनेनी मेघना.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha