IND vs NZ 1st Test, Day 1 LIVE : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला कसोटी सामना, प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...
IND vs NZ 1st Test, Day 1 LIVE : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला कसोटी सामना, प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...
LIVE
![IND vs NZ 1st Test, Day 1 LIVE : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला कसोटी सामना, प्रत्येक अपडेट एका क्लिकवर... IND vs NZ 1st Test, Day 1 LIVE : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला कसोटी सामना, प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/25/a52d18a61fa9f77db75921046d7ce987_original.jpg)
Background
टीम इंडिया तब्बल दोन महिन्यानंतर कसोटी क्रिकेटसाठी सज्ज झालीय. भारत आणि न्यूझीलंड संघात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतली पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात होत आहे. कानपूरमध्ये होणाऱ्या या लढतीत टीम इंडियाची धुरा ही अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर सोपवण्यात आलीय. याच संघात मुंबईच्या आणखी तीन शिलेदारांचा समावेश आहे. कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मासह बिनीच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची मदार ही प्रामुख्यानं मुंबईकर शिलेदारांवरच असणार आहे.
कानपूर कसोटीत भारतानं नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि न्यूझीलंड संघात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतली पहिल्या कसोटीला आजपासून सुरुवात होत आहे. कानपूरमध्ये होणाऱ्या या लढतीत टीम इंडियाची धुरा ही अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर सोपवण्यात आलीय. याच संघात मुंबईच्या आणखी तीन शिलेदारांचा समावेश आहे. कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मासह बिनीच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची मदार ही प्रामुख्यानं मुंबईकर शिलेदारांवरच असणार आहे.
Cheteshwar Pujara On Ajinkya Rahane: भारत आणि न्यूझीलंड (IND Vs NZ) यांच्यातील पहिला कसोटी सामना 25 नोव्हेंबरपासून कानपूर येथे खेळला जाणार आहे. या कसोटी सामन्यापूर्वी उपकर्णधार चेतेश्वर पुजारानं पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पुजारानं आपण लवकरच शतक झळकावणार असल्याचं म्हटलंय. त्यावेळी त्यानं भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणेचंही समर्थन केलंय. राहाणे एक उत्कृष्ट खेळाडू आहे. रहाणे त्याचा फॉर्म परत मिळवण्यापासून केवळ एक डाव दूर असल्याचं पुजारानं म्हंटलंय.
पुजारानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्याला शतकाबाबत विचारण्यात आले. त्यावेळी पुजारा म्हणाला की, "मी 50-60 धावा करत आहे. जोपर्यंत मी असा खेळत आहे, तोपर्यंत काळजी करण्यासारखं काही नाही. मी लवकरच शतक झळकवणार आहे, असा इशाराही त्यानं न्यूझीलंडच्या संघाला दिलाय. त्यानं अजिंक्य रहाणेबाबतही हेच सांगितलं. रहाणे हा मोठा खेळाडू आहे. काही वेळा खेळाडूला वाईट फॉर्मचा सामना करावा लागतो. रहाणे त्याच्या फॉर्मपासून फक्त एक डाव दूर आहे. तो सध्या चांगल्या स्थितीत आहे. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत तो चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे, असा विश्वास पुजारानं व्यक्त केलाय.
अजिंक्य रहाणेनं 2019 पासून भारतासाठी 40 कसोटी सामने खेळले आहेत. यात सात अर्धशतक आणि तीन शतकांचा समावेश आहे. न्यूझीलंडविरुद्ध खेळण्यात येणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणे भारतीय कसोटी संघाचं नेतृत्व करणार आहे. तर, विराट कोहली दुसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन करणार आहे. माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघ पहिली कसोटी मालिका खेळणार आहे.
पहिल्या दिवशी भारताकडून संयमी फलंदाजी, दिवसखेर भारत 258/4
पहिल्या दिवशीचा खेळ संपला असून दिवसाखेर भारताने चार गड्यांच्या बदल्यात 258 धावा केल्या आहेत. सध्या जाडेजा (50) आणि श्रेयस अय्यर (75) मजबूत स्थितीत खेळत आहे.
कर्णधार अजिंक्य रहाणे 35 धावांवर बाद
कर्णधार अजिंक्य रहाणे 35 धावांवर बाद, भारताची स्थिती 4 विकेट्सवर 182 धावा, जेमिसननं घेतल्या तीन विकेट्स
भारताला मोठा झटका, कर्णधार तंबूत परत
भारताचे 3 गडी बाद झाल्यानंतर डाव काहीसा सावरत असल्याचं वाटत असतानाच कर्णधार अजिंक्य रहाणे बाद झाला आहे. जेमिसन याने त्याची विकेट घेतली असून रहाणेने 35 धावांच केल्या आहेत. आता श्रेयस अय्यरसह रवींद्र जाडेजा फलंदाजी करत आहे.
शुभमन गिल 52 बाद तर चेतेश्वर पुजारा 26 धावांवर बाद, भारताच्या 3 विकेट्सवर 106 धावा
शुभमन गिल 52 बाद तर चेतेश्वर पुजारा 26 धावांवर बाद, भारताच्या 3 विकेट्सवर 106 धावा
शुभमन गिल 52 बाद तर चेतेश्वर पुजारा 26 धावांवर मैदानात
शुभमन गिल 52 बाद तर चेतेश्वर पुजारा 26 धावांवर मैदानात, सोबतीला कर्णधार अजिंक्य रहाणे 10 धावांवर नाबाद, भारताच्या 2 विकेट्सवर 106 धावा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)