Daryl Mitchell Ind vs Nz 3rd ODI : कुणालाही न जमलेलं करून दाखवलं! भारताविरुद्ध डॅरिल मिशेलचा वर्ल्ड रेकॉर्ड, क्रिकेट विश्व अचंबित
Daryl Mitchell Century Ind vs Nz 3rd ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील निर्णायक सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जात आहे.

Daryl Mitchell Century Ind vs Nz 3rd ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील निर्णायक सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा स्टार फलंदाज डॅरिल मिशेल याने पुन्हा एकदा भारताविरुद्ध आपली जबरदस्त फॉर्म दाखवत शानदार शतकी खेळी केली. मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात शतक झळकावत न्यूझीलंडला संस्मरणीय विजय मिळवून दिल्यानंतर, तिसऱ्या वनडेतही मिचेलने शतक ठोकत टीम इंडियाला अडचणीत टाकले.
Daryl Mitchell stands tall with back-to-back centuries against India 💪#INDvNZ 📝: https://t.co/MRZ6l9RU7y pic.twitter.com/OZfztuxJvw
— ICC (@ICC) January 18, 2026
भारताविरुद्ध चौथं शतक
न्यूझीलंडसाठी डावाची सुरुवात फारशी चांगली ठरली नाही. अवघ्या 58 धावांत संघाचे तीन फलंदाज तंबूत परतले. मात्र, डॅरिल मिशेलने पुन्हा एकदा संयमी आणि आक्रमक खेळी करत डाव सावरला. त्याने 56 चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. यानंतर ग्लेन फिलिप्ससोबत झालेल्या महत्त्वाच्या भागीदारीमुळे न्यूझीलंडचा स्कोअर 200 धावांच्या पुढे गेला. अखेरीस मिचेलने 106 चेंडूमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. भारताविरुद्ध केवळ 13 सामन्यांत मिचेलने 4 शतकं झळकावली आहेत. विशेष म्हणजे, या मालिकेतील तिन्ही सामन्यांत त्याने 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
भारतात नवा जागतिक विक्रम
डॅरिल मिशेलने एक ऐतिहासिक कामगिरी करत भारतामध्ये भारताविरुद्ध सलग पाच वनडे डावांत 50 पेक्षा अधिक धावा करणारा जगातील पहिला फलंदाज होण्याचा मान पटकावला आहे. हा विक्रम त्याने 2023 च्या वनडे विश्वचषकापासून सुरू ठेवला आहे. 2023 वर्ल्ड कपच्या लीग स्टेजमध्ये त्याने भारताविरुद्ध 130 धावा, तर वानखेडे स्टेडियमवर झालेल्या उपांत्य सामन्यात 134 धावांची दमदार शतकी खेळी केली होती.
चालू मालिकेतही वर्चस्व कायम
सध्याच्या वनडे मालिकेतही मिचेलचा दबदबा कायम आहे. वडोदऱ्यातील पहिल्या वनडेत 84 धावा केल्या. तर दुसऱ्या वनडेत नाबाद 131 धावा ठोकल्या. इंदूरमधील तिसऱ्या वनडेत त्याने शतक ठोकले.
भारतात खेळलेल्या मागील 5 वनडे डाव
- 130 धावा – 2023 वनडे वर्ल्ड कप
- 134 धावा – 2023 वनडे वर्ल्ड कप (उपांत्य सामना)
- 84 धावा – पहिला वनडे (सध्याची मालिका)
- 131 धावा – दुसरा वनडे (सध्याची मालिका)
- 100*+ धावा – तिसरा वनडे (सध्याची मालिका)
हे सर्व सामने भारतात खेळले गेले आहेत. एकूणच पाहता, मिचेलने भारताविरुद्ध सलग चार वनडे डावांत 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. या मालिकेची सुरुवात चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यातील 63 धावांच्या खेळीतून झाली होती. त्यानंतर सध्याच्या मालिकेतील तिन्ही सामन्यांत अर्धशतक झळकावत मिचेलने क्रिकेट इतिहासात आपलं नाव कोरलं आहे.
हे ही वाचा -





















