IND vs NZ 3rd ODI : यशस्वी जैस्वालने ध्रुव जुरेलवर उगारला हात... पुढे जे घडलं ते धक्कादायक! पाहा VIDEO
IND vs NZ 3rd ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि निर्णायक वनडे सामना इंदूरमध्ये खेळला जात आहे.

IND vs NZ 3rd ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि निर्णायक वनडे सामना इंदूरमध्ये खेळला जात आहे. भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि न्यूझीलंडला आधी फलंदाजीसाठी उतरवले. मात्र सामना सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाच्या कॅम्पमध्ये एक मजेशीर आणि चर्चेचा प्रसंग घडला.
🚨 Toss Update 🚨 #TeamIndia win the toss in the decider and elect to bowl first.
— BCCI (@BCCI) January 18, 2026
Updates ▶️ https://t.co/KR2ertVUf5#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/2VBlbox60u
यशस्वी जैस्वालने ध्रुव जुरेलवर हात उगारला
सामन्यासाठी निघण्यापूर्वी संघ बसमध्ये चढत असताना हा प्रसंग घडला. यशस्वी जैस्वाल बसकडे पुढे जात होता, तर त्याच्या मागे ध्रुव जुरेल चालत होता. याच वेळी जुरेलने यशस्वीची थोडीशी चेष्टा केली. ही गोष्ट यशस्वीला फारशी आवडली नाही आणि त्याने जुरेलवर हात उगारला.
काणाखाली बसण्याआधीच वाचला जुरेल
मात्र, यशस्वीने फक्त हात उगारला, पण मारला नाही. त्यामुळे ध्रुव जुरेल काणाखाली खात-खात वाचला. व्हिडिओमध्ये जुरेलने नेमके काय केले, हे स्पष्ट दिसत नसले तरी हा सगळा प्रकार मस्ती-मजाकाचाच असल्याचे स्पष्ट होते. कारण दोघेही हसत-खेळत बसमध्ये चढताना दिसले.
पंतच्या जागी संघात दाखल झाला जुरेल
ध्रुव जुरेलला या मालिकेदरम्यान भारतीय संघात संधी मिळाली आहे. ऋषभ पंतला दुखापतीमुळे पहिल्या वनडेनंतर संघाबाहेर जावे लागले, त्यानंतर वडोदरा वनडेनपूर्वी जुरेलचा संघात समावेश करण्यात आला. विजय हजारे ट्रॉफीत चांगली कामगिरी करून आलेल्या जुरेलला मात्र या वनडे मालिकेत अद्याप अंतिम अकरामध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही.
Dhruv Jurel teasing Yashasvi Jaiswal after the practice session, and Jaiswal almost slapped him 😂😂
— Sonu (@Cricket_live247) January 17, 2026
What do you think Dhruv Jurel said to trigger that reaction? pic.twitter.com/IXzdmiGp5e
यशस्वीलाही वनडे मालिकेत संधी नाही
दुसरीकडे, यशस्वी जैस्वाल आधीपासूनच न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे संघाचा भाग आहे. मात्र त्यालाही या मालिकेतील एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नाही. हा प्रसंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, टीम इंडियातील खेळाडूंमधील मैत्रीपूर्ण वातावरणाचेच दर्शन घडवत आहे.
हे ही वाचा -





















