IND vs SA : पहिल्या सामन्यातच टीम इंडियाकडे इतिहास रचण्याची संधी; दक्षिण आफ्रिकेला करावं लागेल पराभूत
भारतीय संघाचा सामना उद्यापासून अर्थात 9 जून पासून दक्षिण आफ्रिकेशी टी20 सामन्यांसाठी भारतीय भूमीत होणार आहे. पाच टी-20 सामन्यांची मालिका यावेळी खेळवली जाईल.
India vs South Africa, T20 : दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. 5 टी20 सामन्यांच्या मालिकेतील या पहिल्या सामन्यातच भारतीय संघाकडे इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. कारण जर टीम इंडियाने पहिला टी20 सामना जिंकला तर टी20 क्रिकेट सामन्यांत भारताचा हा सलग 13 वा टी20 विजय असेल. यापूर्वी भारताने 12 टी20 सामने जिंकले आहेत.
आतापर्यंच टी20 क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या संघाने सलग 13 सामने जिंकलेले नाहीत. आतापर्यंत अफगाणिस्तानने सलग 12 टी20 सामने जिंकले असून टीम इंडियाने याआधीच या रेकॉर्डची बरोबरी केली असून आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक विजय मिळवताच हा रेकॉर्ड तोडून टीम इंडिया इतिहास रचू शकते. सध्या भारतीय संघ टी20 क्रिकेट फॉर्मेटमध्ये नंबर 1 आहे.
आतापर्यंत भारताचं पारडं जड
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 15 टी-20 सामने खेळले गेले. यापैकी नऊ सामन्यात भारतानं बाजी मारली आहे. तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सहा सामन्यावर ठसा उमठवता आला आहे. परंतु, भारतीय दौऱ्यावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाच पारडं जड दिसलं. भारतात दक्षिण आफ्रिकेनं आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामने जिंकले आहेत. तर, फक्त एकच सामना गमावला आहे. याआधी 2019 मध्ये पहिल्यांदाच टी-20 मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात आला होता. त्यावेळी तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यात आली होती. परंतु, पावसामुळं या मालिकेतील पहिला सामना रद्द झाला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतानं दमदार प्रदर्शना करत सामना जिंकला. तर, तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं विजय मिळवला.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यांचे वेळापत्रक
सामना | दिनांक | ठिकाण |
पहिला टी20 सामना | 9 जून | अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली |
दुसरा टी20 सामना | 12 जून | बाराबती स्टेडियम, कट्टक |
तिसरा टी20 सामना | 14 जून | डॉ वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम,विशाखापट्टणम |
चौथा टी20 सामना | 17 जून | सौराष्ट्र क्रिकेट असोसीएशन स्टेडियम, राजकोट |
पाचवा टी20 सामना | 19 जून | एम. चिन्नस्वामी स्टेडियम बंगळुरु |