Ind vs SA T20I: टीम इंडियाकडं इतिहास रचण्याची संधी, दक्षिण आफ्रिकाविरुद्ध कामगिरी कशी? येथे मिळवा संपूर्ण माहिती
Ind vs SA T20I: भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघानं (Team India) नोव्हेंबर 2021 पासून फेब्रुवारी 2022 पर्यंत सलग 12 टी-20 सामने जिंकले आहेत.
Ind vs SA T20I: भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघानं (Team India) नोव्हेंबर 2021 पासून फेब्रुवारी 2022 पर्यंत सलग 12 टी-20 सामने जिंकले आहेत. सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ (South Africa) भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत रोहित शर्माला विश्रांता देण्यात आली आहे. यामुळं भारताचा युवा फलंदाज केएल राहुलकडं (KL Rahul) या मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 मालिकेतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाचा नवा पराक्रम रचण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
भारताकडं इतिहास रचण्याची संधी
दरम्यान, फेब्रुवारी 2018 ते सप्टेंबर 2019 या कालावधीत अफगाणिस्तानच्या संघानं सलग 12 टी-20 सामने जिंकले होते. त्यानंतर रोमानियानं ऑक्टोबर 2020 ते सप्टेंबर 2021 दरम्यान अफगाणिस्तानच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. भारतानंही सलग 12 टी-20 सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध 9 जून रोजी होणाऱ्या पहिल्या टी-20 सामन्यात विजय मिळवून नव्या विक्रमाला गवसणी घालण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.
टी-20 क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील हेड टू हेड रेकार्ड
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 15 टी-20 सामने खेळले गेले. यापैकी नऊ सामन्यात भारतानं बाजी मारली आहे. तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सहा सामन्यावर ठसा उमठवता आला आहे. परंतु, भारतीय दौऱ्यावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाच पारडं जड दिसलं. भारतात दक्षिण आफ्रिकेनं आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामने जिंकले आहेत. तर, फक्त एकच सामना गमावला आहे.
याआधी 2019 मध्ये पहिल्यांदाच टी-20 मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात आला होता. त्यावेळी तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यात आली होती. परंतु, पावसामुळं या मालिकेतील पहिला सामना रद्द झाला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतानं दमदार प्रदर्शना करत सामना जिंकला. तर, तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं विजय मिळवला.
हे देखील वाचा-