Ashes 2021: सिडनी कसोटीपूर्वी कोरोनानं टेन्शन वाढवलं, मॅच रेफरी David Boon संक्रमित
David Boon has tested positive for Covid-19: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (ENG Vs AUS) यांच्यात सुरु असलेल्या अॅशेस मालिकेतील चौथा कसोटी सामना सिडनी (Sydney) येथे खेळला जाणार आहे.
David Boon has tested positive for Covid-19: ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि आयसीसीचे मॅच रेफरी डेव्हिड बून (David Boon) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलीय. आयसीसीनं (ICC) गुरुवारी ट्विट करून ही माहिती दिलीय. डेव्हिड बून हे ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या अॅशेस मालिकेत मॅच रेफरी आहेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (ENG Vs AUS) यांच्यात सुरु असलेल्या अॅशेस मालिकेतील चौथा कसोटी सामना सिडनी (Sydney) येथे खेळला जाणार आहे. डेव्हिड बून पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या जागेवर स्टीव्ह बर्नार्डकडं (Steve Bernard) ही जबाबदारी देण्यात आलीय.
नुकतंच आयसीसीनं ट्वीट केलंय. ज्यात त्यांनी असं म्हटलंय की, "मॅच रेफरी डेव्हिड बून यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलीय. येत्या 5 जानेवारीपासून अॅशेस मालिकेतील चौथा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात स्टीव्ह बर्नार्ड हे डेव्हिड बून यांची जागा घेतील." दरम्यान, पाच सामन्याच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियानं 3-0 आघाडी घेऊन या मालिकेवर आधीच कब्जा केलाय. डेव्हिड बून यांनी 29 डिसेंबरला त्यांचा 61 वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहे. याव्यतिरिक्त त्यांना बूस्टर डोसही मिळालाय.
आयसीसीचं ट्वीट-
बून मेलबर्नमध्येच राहतील, जिथे तिसरा कसोटी सामना खेळला गेला. त्याना 10 दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे. यापूर्वी मेलबर्न कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या कॅम्पमध्ये कोरोनाचे चार रुग्ण आढळून आले होते. सपोर्ट स्टाफमधील दोन सदस्य आणि सपोर्ट स्टाफच्या कुटुंबातील दोन सदस्यांना संसर्ग झाल्याची माहिती समोर आली होती. यामुळं ऑस्ट्रेलिया- इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळही अर्धा तास उशिरानं सुरू करण्यात आला होता.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-