सचिन तेंडुलकरच्या लेकाची मुंबई रणजी संघात वर्णी, पृथ्वी शॉकडे नेतृत्व
Arjun Tendulkar Selected In Mumbai's Ranji Team : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकर याचा मुंबईच्या रणजी संघात (Ranji Trophy) समावेश करण्यात आला आहे.
Arjun Tendulkar Selected In Mumbai's Ranji Team: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) लेक अर्जुन तेंडुलकर याचा मुंबईच्या वीस सदस्यीय रणजी संघात (Ranji Trophy) समावेश करण्यात आला आहे. सलिल अंकोला, गुलाम परकार, सुनील मोरे, प्रसाद देसाई आणि आनंद याल्विगी यांच्या निवड समितीनं मुंबई संघाची निवड केली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीविरुद्धच्या रणजी सामन्यांसाठी ही निवड करण्यात आली आहे. भारतीय संघातून बाहेर असलेल्या पृथ्वी शॉ याच्याकडे संघाचं नेतृत्व देण्यात आलं आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पोलीस ढाल स्पर्धेत एमआयजीकडून खेळताना अर्जुन तेंडुलकरनं उपांत्य सामन्यात 57 धावांत पारसी जिमखान्याच्या चार फलंदाजांना माघारी धाडलं होतं. शालिनी भालेकर करंडकातल्या एका सामन्यात त्यानं 62 चेंडूंत 85 धावांची खेळी केली. अर्जुनच्या या कामगिरीनं निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं. पण पोलीस ढाल स्पर्धेच्या फायनलमध्ये सर्वोत्तम गोलंदाज ठरलेला आतिफ अत्तारवालाला निवड समितीनं न्याय दिलेला नाही. अत्तारवालानं फायनलच्या दोन डावांमध्ये मिळून पारसी जिमखान्याच्या सहा आणि उपांत्य सामन्यात पार्कोफिनच्या चार विकेट्स काढल्या होत्या. त्याचाच सहकारी रॉयस्टन डायसची मात्र मुंबई संघात निवड झाली आहे.
मुंबई संघाने आतापर्यंत 41 वेळा रणजी चषकावर नाव कोरलं आहे. यावेळी नऊ संघाना एलीट ग्रुप सी मध्ये ठेवण्यात आलं आहे. मुंबईचा पहिला सामना 13 जानेवारी रोजी महाराष्ट्राविरोधात होणार आहे. त्यानंतर कोलकातामध्ये 20 जानेवारी रोजी दिल्लीशी सामना होणार आहे.
रणजी चषकासाठी मुंबईचा संघ -
पृथ्वी शॉ (कर्णधार), यशस्वी जायस्वाल, आकर्षित गोमेल, अरमान जाफर, सरफराज खान, सचिन यादव, आदित्य तारे (विकेटकीपर), हार्दिक तमोर (विकेटकीपर), शिवम दुबे, अमन खान, शम्स मुलानी, तनुष कोटियन, प्रशांत सोळंकी, शशांक अटारडे, धवल कुलकर्णी, मोहित अवस्थी, प्रिंस बडियानी, सिद्धार्थ राऊत, रोयस्टन डायस आणि अर्जुन तेंडुलकर
Ranji Trophy Team for match against Maharashtra and Delhi pic.twitter.com/OHTSMH2ZNC
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) December 29, 2021
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live