एक्स्प्लोर

IND vs SA Test : मोहम्मद सिराज करतोय ख्रिस्तियानो रोनाल्डोला फॉलो, सिराजचा सेलिब्रेशनचा व्हिडीओ पाहिलात का?

IND vs SA Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा युवा गोलंदाज मोहम्मद सिराजचा विकेट घेतल्यानंतरचं सेलिब्रेशन चांगलाच व्हायरल होत आहे.

Ind vs SA : दक्षिण आफ्रिकेच्या सेंच्युरियन मैदानात (Centurion) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs Sout Africa) यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. सध्यातरी सामन्यात भारताने वर्चस्व मिळवलं असलं तरी विजय अजून दूर आहे. सामन्यात भारतीय खेळाडूंकडून उत्तम प्रदर्शन दिसत असलं तरी भारताच्या गोलंदाजीची सुरुवात झाल्यापासून एक व्हिडीओ बराच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ म्हणजे भारताचा युवा गोलंदाज मोहम्मद सिराज याचा. सिराज या सामन्यात विकेट घेतल्यानंतर आनंद साजरा करताना प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोप्रमाणे अॅक्शन करत आहे. त्यामुळे सिराजचं हे सेलिब्रेशन सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकजण हा व्हिडीओ शेअर करत आहेत. तर या व्हिडीओवर तुम्हीही एक नजर फिरवाच...

आतापर्यंत पार पडलेल्या सामन्यात सिराजने पहिल्या डावात एक विकेट घेतली आहे. तर दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेचे 3 गडी बाद होईपर्यंतही सिराजच्या खात्यात एक विकेट आहे. सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत राहुलचं शतक, अगरवालचं अर्धशतकाच्या जोरावर 327 धावा केल्या. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिका संघावर सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजांनी दबदबा कायम ठेवला. 197 धावांवर भारताने आफ्रिकेला सर्वबाद करत सामन्यावरील पकड मजबूत केली. ज्यानंतर 130 धावांची आघाडी घेऊन भारताने दुसऱ्या डावाची फलंदाजी सुरु केली. पण भारताचा एकही फलंदाज खास कामगिरी करु शकला नाही. केएल राहुलने सुरुवातीला टिकून खेळण्याचा प्रयत्न केला पण दुसऱ्या बाजूने विकेट जात असल्याने राहुलही 23 धावा करुन बाद झाल. मग पुजारा आणि कोहली खेळ सांभाळत आहेत, असे वाटत होते. पण तेव्हाच आधी पुजारा 16 आणि मग कोहली 18 धावा करुन तंबूत परतले. रहाणेही 20 धावाच करु शकला. ज्यानंतर ऋषभ पंतने अखेरच्या काही षटकात 34 धडाकेबाज धावा केल्या. ज्याच्या जोरावर भारताने 174 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 305 धावांची आवश्यकता आहे. 

हे ही वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Congress : काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे 
पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे 
बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
मोठी बातमी! PNB बँक घोटाळ्यातील दोषी मेहुल चोक्सीला कॅन्सर, बेल्जियमध्ये उपचार सुरू; कोर्टातून माहिती उघड
मोठी बातमी! PNB बँक घोटाळ्यातील दोषी मेहुल चोक्सीला कॅन्सर, बेल्जियमध्ये उपचार सुरू; कोर्टातून माहिती उघड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 11 February 2025Rinku Rajguru Kolhapur | कोल्हापुरात आर्ची आली, फोटोमुळं चर्चा झाली! Special ReportTanaji Sawant Son Kidnapping| कहाणी नेत्याच्या लेकाच्या अधुऱ्या बँकॉक वारीची ABP MajhaBharat Gogawle on Palakmantripad : पालकमंत्रिपदावरून तिन्ही पक्षात धुसफूस सुरूच Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Congress : काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे 
पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे 
बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
मोठी बातमी! PNB बँक घोटाळ्यातील दोषी मेहुल चोक्सीला कॅन्सर, बेल्जियमध्ये उपचार सुरू; कोर्टातून माहिती उघड
मोठी बातमी! PNB बँक घोटाळ्यातील दोषी मेहुल चोक्सीला कॅन्सर, बेल्जियमध्ये उपचार सुरू; कोर्टातून माहिती उघड
पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला राज्यात 42 केंद्रावर कॉपी; 12 वी परीक्षेत मराठवाड्यातच सर्वाधिक कॉपीची नोंद
पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला राज्यात 42 केंद्रावर कॉपी; 12 वी परीक्षेत मराठवाड्यातच सर्वाधिक कॉपीची नोंद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
Embed widget