Hardik Pandya: 'तेच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं गिफ्ट' वाढदिवसाच्या दिवशी हार्दिक पांड्याची इमोशनल पोस्ट
Happy Birthday Hardik Pandya: भारतीय संघाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आज 29 वर्षाचा झालाय.
![Hardik Pandya: 'तेच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं गिफ्ट' वाढदिवसाच्या दिवशी हार्दिक पांड्याची इमोशनल पोस्ट Hardik Pandya Birthday: India All Rounder Hardik Pandya Emotional Post On his birthday Hardik Pandya: 'तेच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं गिफ्ट' वाढदिवसाच्या दिवशी हार्दिक पांड्याची इमोशनल पोस्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/11/98a56d1a90afe8b7c2d70982e667e6aa1665475072631266_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Happy Birthday Hardik Pandya: भारतीय संघाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आज 29 वर्षाचा झालाय. आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup 2022) खेळल्यासाठी भारतीय संघासोबत हार्दिक पांड्या ऑस्ट्रेलियाला दाखल झालाय, जिथे तो विश्वचषकाची तयारी करत आहे. तर, त्याचं कुटुंब भारतात आहे. हार्दिक पांड्यानं त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. या व्हिडिओला हार्दिकनं दिलेलं कॅप्शन पाहून तो त्याचा मुलगा अगस्त्यला खूप मिस करत असल्याचं दिसत आहे.
हार्दिक पांड्याची भावूक पोस्ट-
View this post on Instagram
हार्दिक पांड्यानं इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय. ज्यामध्ये तो मुलगा अगत्स्यासोबत क्रिकेट खेळताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये अगस्त्य खूपच क्यूट दिसत आहे आणि तो हार्दिकची बॅट उचलताना दिसत आहे. हार्दिक पांड्याची पत्नी नताशा हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. हा व्हिडिओ पांड्याच्या मुंबईतील घराचा असल्याचं सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ शेअर करत पांड्याने लिहिले आहे की, "माझ्या वाढदिवशी मी माझा मुलगा अगस्त्यला खूप मिस करत आहे. अगस्त्य हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं गिफ्ट आहे."
पत्नी नताशाचीही आठवण
हार्दिक पांड्यानं ऑस्ट्रेलियात पोहचताच त्याची पत्नी नताशासोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यानं नताशाला खूप मिस करत असल्याचं लिहिलं होतं. हार्दिक पांड्यानं 2020 मध्ये नताशाशी लग्न केलं होतं. यापूर्वी काही महिन्यांपूर्वी हार्दिकनं फिल्मी स्टाईलमध्ये नताशाला अंगठी घालत समुद्रामध्ये बोटीत साखरपुडा केला होता. नताशा नेहमीच सोशल मीडिया सक्रीय असते. नताशा तिच्या हॉटनेस आणि ग्लॅमरसाठी ओळखली जाते. तिनं सौंदर्यात बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागं टाकलं आहे.
हार्दिक पांड्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
हार्दिक पांड्याने आतापर्यंत 73 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं 54 विकेट घेतल्या आणि 989 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याचा स्ट्राइक रेट 148.5 इतका आहे. हार्दिक एकदिवसीय सामन्यांमध्ये अधिक यशस्वी ठरला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं 66 सामन्यांमध्ये 63 विकेट घेतल्या असून 1 हजार 386 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याची फलंदाजी सरासरी 34 धावांची आहे. हार्दिक कसोटी क्रिकेटमध्ये तितका प्रभावी ठरलेला नाही. आतापर्यंत त्याला 11 कसोटी खेळण्याची संधी मिळाली आहे. ज्यात त्यानं 17 विकेट घेतल्या आहेत आणि 532 धावा केल्या आहेत.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)