MS Dhoni: धोनीच्या मार्गदर्शनाखाली तयार होतील भविष्यातील स्टार खेळाडू; तामिळनाडूमध्ये 'सुपर किंग्ज ॲकडमी' उघडली
MS Dhoni's Super Kings Academy: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) पु्न्हा एकदा चर्चेत आलाय.
MS Dhoni's Super Kings Academy: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) पु्न्हा एकदा चर्चेत आलाय. धोनीनं तामिळनाडूच्या (Tamilnadu) होसूर (Hosur) येथे सुपर किंग्ज ॲकडमी (Super Kings Academy) उघडली आहे. या ॲकडमीत आठ खेळपट्टी तयार करण्यात आल्या आहेत. भविष्यातील स्टार खेळाडूंना चांगलं प्रशिक्षण देणं या ॲकडमीचा उद्देश आहे. आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जच्या मदतीनं या ॲकडमीची सुरुवात करण्यात आलीय
धोनीनं 15 ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं. सध्या तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचं नेतृत्व करताना दिसतोय. आयपीएलच्या सर्वाधिक यशस्वी कर्णधारांमध्ये त्याची गणना केली जाते. धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जनं चार वेळा आयपीएलचं खिताब जिंकलंय. तर, रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सनं सर्वाधिक पाच वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकलीय.
ट्वीट-
Now the cubs of Hosur can also #TrainLikeASuperKing
— Super Kings Academy (@SuperKingsAcad) October 10, 2022
and who better to start things off than our Skipper! 🦁
📖➡️ https://t.co/IPdZZ40ydh#SuperKingsAcademy 🏏 pic.twitter.com/38Hfr749V4
आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा धोनी एकमेव कर्णधार
आयसीसीच्या सर्व प्रमुख ट्रॉफी (एकदिवसीय विश्वचषक, टी-20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी) जिंकणारा महेंद्रसिंह धोनी पहिला एकमेव कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वात भारतानं 2007 मध्ये पहिल्या टी-20 विश्वचषकावर नाव कोरलं. त्यानंतर 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकवून क्रिकेटविश्वात भारताचा झेंडा फडकवला. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं आणखी एक पराक्रम केलाय. 2013 च्या आयसीसी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतानं इंग्लंडचा पराभव करून इतिहास रचला.
महेंद्रसिंह धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
महेंद्र सिंह धोनीने त्याच्या कारकिर्दीत 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि 98 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यांमध्ये त्यानं 6 शतक, एक द्विशतक, 33 अर्धशतक केलं आहेत. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 4 हजार 876 धावा केल्या आहेत. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण 10 हजार 773 धावा केल्या आहेत. यामध्ये 10 शतक, 79 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्यानं एकूण 1 हजार 617 धावा केल्या आहेत. धोनीनं 190 आयपीएल सामने खेळले. यामध्ये त्याने एकूण 4 हजार 432 धावा केल्या आहेत.
हे देखील वाचा-