एक्स्प्लोर

Hardik Pandya: हॅप्पी बर्थडे कुंग फू पांड्या! फलंदाजी असो किंवा गोलंदाजी नेहमीच आक्रमक; पठ्ठ्याच्या कारकिर्दीवर एक नजर 

Happy Birthday Hardik Pandya: भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आज त्याचा 29 वा वाढदिवस साजरा करतोय. हार्दिक पांड्यानं आपल्या कारकिर्दीत अनेक मोठ्या विक्रमाला गवसणी घातलीय.

Happy Birthday Hardik Pandya: भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आज त्याचा 29 वा वाढदिवस साजरा करतोय. हार्दिक पांड्यानं आपल्या कारकिर्दीत अनेक मोठ्या विक्रमाला गवसणी घातलीय. जगभरातील आक्रमक खेळाडूंमध्ये हार्दिक पांड्याची गणना केली जाते. फलंदाजी असो किंवा गोलंदाजी भारताच्या अनेक विजयात त्यानं मोलाचं योगदान दिलंय. हार्दिक पांड्यानं 26 जानेवारी 2016 मध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आयपीएल 2015 मध्ये हार्दिकनं आक्रमक फलंदाजीसह गोलंदाजीतही चमक दाखवली. त्यानंतर भारतीय संघाच्या निवडकर्त्यांची त्याच्यावर नजर पडली. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात म्हणजेच गेल्या वर्षी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सनं त्यांच्या पदार्पणाच्या हंगामातच आयपीएलची ट्रॉफी जिंकली. ऑस्ट्रेलियात पुढच्या आठवड्यापासून रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकात हार्दिक पांड्या भारतीय संघाचा भाग आहे. हार्दिक पांड्या भारतीय संघाचा भविष्यातील कर्णधार असल्याचंही अनेक क्रिकेट तज्ज्ञांचं मत आहे. 

19 व्या वर्षी देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण
हार्दिक पांड्याला वयाच्या 19व्या वर्षी देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यानं 17 मार्च 2013 रोजी मुंबईविरुद्ध बडोद्याकडून पहिला टी-20 सामना खेळला होता. त्यानंतर एका वर्षातच त्याला बडोद्याकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्याची संधीही मिळाली. 2013 ते 2015 दरम्यान, हार्दिकनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या अष्टपैलू कामगिरीनं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. परिणामी, आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सनं 2015 मध्ये त्याची संघात निवड केली. 

आयपीएलच्या पदार्पणाच्या हंगामातच दाखवला दम
हार्दिकनं 2015 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं. पदार्पणाच्या हंगामात हार्दिकला 9 सामने खेळण्याची संधी मिळाली. गोलंदाजीत त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. पण फलंदाजीत त्यानं चमक दाखवली. त्याला  काही प्रसंगी फलंदाजीची संधी मिळाली, पण या संधीचं सोनं करून दाखवलं. जेव्हा-जेव्हा तो फलंदाजीला आला, त्यानं मोठे फटके मारले. या हंगामात त्यानं 180 च्या स्ट्राईक रेटनं धावा केल्या. त्याच्या या प्रभावी कामगिरीमुळं त्याला जानेवारी 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण
हार्दिकने 26 जानेवारी 2016 रोजी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. हादिकच्या एंट्रीनं टीम इंडियाची दीर्घकाळ प्रलंबित वेगवान गोलंदाजी अष्टपैलू खेळाडूंची कमतरता भरून काढली. आयपीएल 2016 मधील दमदार प्रदर्शनाच्या जोरावर त्यानं 16 ऑक्टोबर 2016 रोजी भारतीय एकदिवसीय संघात एन्ट्री मिळवली. त्यानंतर जुलै 2017 मध्ये त्याला कसोटी कॅपही मिळाली.

2021 च्या टी-20 विश्वचषकानंतर 5 महिने मैदानाबाहेर
भारतीय संघाचा महत्त्वाचा खेळाडू बनलेल्या हार्दिक पांड्यासाठी 2021 हे वर्ष खूपच वाईट ठरले. हार्दिक हा फलंदाजीसह गोलंदाजीतही सतत फ्लॉप ठरत होता. टी-20 विश्वचषकातही त्याची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. यानंतर त्याला अनफिट घोषित करण्यात आले. तो जवळपास 5 महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. त्यावेळी हार्दिक पांड्याची कारकिर्दी संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवली जात होती. 

आयपीएल 2022 मधील कामगिरीनं संघात पुनरागमन
आयपीएल 2022 मधून हार्दिक पांड्यानं पुन्हा मैदानात पुनरागमन केलं. त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सनं पदार्पणाच्या हंगामात ट्रॉफी जिंकली. याशिवाय हार्दिकनं फलंदाजीसह गोलंदाजीतही जबरदस्त कामगिरी करून दाखवली. या हंगामात हार्दिक पांड्यानं 487 धावा केल्या आणि 8 विकेट्स घेतल्या. दरम्यान, अनेक सामन्यात त्यानं मॅच विनिंग खेळी केली. ज्यामुळं भारतीय संघातं त्याचं पुनरागमन झालं. तेव्हापासून हार्दिक पांड्या तुफान फॉर्ममध्ये आहे. भारताच्या आयर्लंड दौऱ्यात त्यानं भारतीय टी-20 संघाचं नेतृत्व केलं. आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी-20 मालिका भारतानं 2-0 अशी जिंकली. 

हार्दिक पांड्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
हार्दिक पांड्याने आतापर्यंत 73 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं 54 विकेट घेतल्या आणि 989 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याचा स्ट्राइक रेट 148.5 इतका आहे. हार्दिक एकदिवसीय सामन्यांमध्ये अधिक यशस्वी ठरला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं 66 सामन्यांमध्ये 63 विकेट घेतल्या असून 1 हजार 386 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याची फलंदाजी सरासरी 34 धावांची आहे. हार्दिक कसोटी क्रिकेटमध्ये तितका प्रभावी ठरलेला नाही. आतापर्यंत त्याला 11 कसोटी खेळण्याची संधी मिळाली आहे. ज्यात त्यानं 17 विकेट घेतल्या आहेत आणि 532 धावा केल्या आहेत.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget