(Source: ECI | ABP NEWS)
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : 2019 मध्ये पवार, ठाकरेंची निवडणुकीआधीच हातमिळवणी : फडणवीस
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : 2019 मध्ये पवार, ठाकरेंची निवडणुकीआधीच हातमिळवणी : देवेंद्र फडणवीस
२०१९ मध्ये शरद पवार आण उद्धव ठाकरेंची निवडणुकीआधीच हातमिळवणी झाली होती, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. जर भाजपच्या १२० पेक्षा जास्त जागा आल्या असत्या तर उद्धव ठाकरेंनी युती तोडली नसती, असंही ते म्हणालेत. २०१९ च्या निवडणुकीतल्या बंद दाराआड चर्चेच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी ठाकरेंवर आरोप केलेत. ठाकरेंना मुख्यमंत्रिपद हवं होतं, तर त्यांनी चर्चा करायला हवी होती, पण पवारांसोबत जायचं असल्यानं त्यांनी आपले फोनच घेणं बंद केलं होतं, असं फडणवीस यांनी म्हटलंय..दरम्यान यावरून संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय. २०१४ ला युती का तोडली अस सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
























