एक्स्प्लोर

Deepak Hooda: दीपक हुडा चमकला! आयर्लंडविरुद्ध शतक झळकावून रचला इतिहास

India tour of Ireland: आयर्लंडविरुद्ध डबलिनच्या द व्हिलेज स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं चार धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतानं 2-0 नं मालिका जिंकली.

India tour of Ireland: आयर्लंडविरुद्ध डबलिनच्या द व्हिलेज स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं चार धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतानं 2-0 नं मालिका जिंकली. या मालिकेत भारताचा युवा फलंदाज दीपक हुडानं (Deepak Hooda) चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. पहिल्या सामन्यात 47 धावांची खेळी केल्यानंतर दुसऱ्या सामन्यात शतक झळकावून त्यानं खास विक्रमाला गवसणी घातलीय. भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणार तो चौथा फलंदाज ठरलाय. याआधी रोहित शर्मा, सुरेश रैना आणि केएल राहुलनं भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात शतक ठोकलंय. 

रोहित शर्मा, सुरेश रैनाच्या पंक्तीत स्थान
दुसऱ्या टी-20 मध्ये दीपकला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्यानं 57 चेंडूत 104 धावा केल्या. दीपकच्या खेळीत 9 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश आहे. भारतासाठी टी-20 सामन्यात शतक झळकावणारा तो चौथा खेळाडू ठरलाय.  आंतरराष्ट्रीय टी-20  क्रिकेटमध्ये सर्वाधिक चार शतक झळकावण्याचा विक्रम भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर आहे. त्यानंतर केएल राहुल दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर दोन शतकांची नोंद आहे. तर, भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाहीनं टी-20 क्रिकेटमध्ये एक शतक ठोकलंय. या यादीत आता दीपक हुडाचा समावेश झालाय. 

रोमहर्षक सामन्यात भारताचा चार धावांनी विजय
दुसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानंतर भारतानं 20 षटकात सात विकेट्स गमावून आयर्लंडसमोर 226 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात आयर्लंडच्या संघाला भारताला कडवी झुंज दिली. विशाल लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आयर्लंडच्या संघाला फक्त चार धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारताकडून शतक झळकावणारा दीपक हुडानं सामनावीर ठरला. तसेच मालिकावीराच्या पुरस्कारानंही त्याला गौरवण्यात आलं. 

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget