एक्स्प्लोर

IND vs IRE, Match Highlights : रोमहर्षक सामन्यात आयर्लंडची कडवी झुंज व्यर्थ, भारताचा 4 धावांनी विजय, मालिकाही खिशात

IND vs IRE Live : आयर्लंड संघाने अत्यंत अप्रतिम झुंज दिली, पण ते 226 धावांच लक्ष्य गाठण्यापासून केवळ 4 धावा कमी राहिले, ज्यामुळे त्यांच्या हातातून सामना थोडक्यात गेला.

IND vs IRE Live : भारत आणि आयर्लंड  (India vs Ireland) यांच्यातील दुसरा टी20 सामना अत्यंत रोमहर्षक झाला. भारताने दिलेलं 226 धावांचे तगडे आव्हान पूर्ण करण्यात आयर्लंडचा संघ केवळ 4 धावांनी कमी पडला. ज्यामुळे दुसरा टी20 सामना भारताने जिंकत मालिकाही 2-0 ने जिंकली आहे. आयर्लंडच्या फलंदाजांनी एक कडवी झुंज देत उत्तम प्रदर्शन घडवलं.

सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर ईशान स्वस्तात तंबूत परतल्यानंतर दीपक हुडा आणि संजू सॅमसन या जोडीने अगदी धमाकेदार फलंदाजी करत चौफेर फटकेबाजी केली. दीपकने 57 चेंडूत 9 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 104 धावा केल्या. तर संजूने  42 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 77 धावा केल्या. पण या दोघांशिवाय इतर खेळाडू मात्र खास कामगिरी करु शकले नाहीत. विशेष म्हणजे भारताने तीन खेळाडू शून्यावर बाद झाले. कार्तिक, अक्षर आणि हर्षल शून्यावर बाद झाले. आयर्लंडकडून मार्कने 3 तर जोशूवा आणि क्रेगने प्रत्येकी 2 विकेट्स घेतले. पण भारताने संजू आणि दीपकच्या खेळीच्या जोरावर 225 धावा स्कोरबोर्डवर लावल्या.

आयर्लंडची कडवी झुंज

226 धावांचं मोठं आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात आलेल्या आयर्लंडने सुरुवातीपासूनच चांगली कामगिरी सुरु ठेवली. सलामीवीरांनी तब्बल 72 धावांची भागिदारी उभारली. त्यानंतर पॉल 40 धावा करुन बाद झाला. त्यानंतर कर्मधार अँन्ड्रूयने 60 धावांची अप्रतिम खेळी केली. पण नंतर तोही बाद झाला. अखेरच्या काही ओव्हरमध्ये हॅरी टक्टर आणि जॉर्ज यांनी विजयाच्या दिशेने वेगवान आगेकूच केली. पण हॅरी 39 धावा करुन बाद झाला. जॉर्जने नाबाद 34 तर मार्कने नाबाद 23 धावा केल्या पण अखेरच्या षटकात उमरानने आयर्लंडला गरजेच्या असलेल्या 17 धावा करुन न दिल्याने सामना अखेर भारताने जिंकला. यासोबतच मालिकाही 2-0 ने जिंकला आहे.

हे देखील वाचा - 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget