(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Champions Trophy :..तर पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी होणार नाही, माजी क्रिकेटरनं दिला मोठा इशारा
Champions Trophy : पुढील वर्षी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन पाकिस्तानात होणार आहे. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित केली जाणार आहे.
नवी दिल्ली : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं (Champions Trophy) आयोजन पुढील वर्षी पाकिस्तानात (Pakistan) केलं जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन पाकिस्तानमध्ये होत असून भारताचे सामने लाहोरच्या मैदानात आयोजित करण्याचं पीसीबीचं नियोजन आहे. सुरक्षेच्या कारणामुळं भारताचे सामने एकाच स्टेडियममध्ये आयोजित करण्याचा विचार पीसीबीचा आहे. मात्र, भारतानं पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळं भारतानं हायब्रीड पद्धतीनं स्पर्धा राबवण्याची मागणी केली आहे. भारताचे सामने श्रीलंका किंवा दुबईत घ्यावेत असा भारताचा प्रस्ताव आहे. तर, भारतानं आमच्या देशात क्रिकेट खेळण्यास यावं, अशी भूमिका पाकिस्तानची आहे. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बासित अली (Basit Ali) यांनी पीसीबीला इशारा दिला आहे. सुरक्षेच्या बाबतीत काहीही गडबड झाली तर चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन हातातून निसटेल, असा इशारा त्यांनी दिला.
टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार बासित अली यांनी पाकिस्तानला गंभीर इशारा दिला आहे. आपल्याला सुरक्षेचं विशेष ध्यान ठेवायला लागणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी पूर्वी पाकिस्तान इंग्लंड आणि वेस्ट इंडिज विरुद्ध सामने खेळणार नाही. याशिवाय बांगलादेश देखील पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकांमध्ये कोणताही सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यास पाकिस्तानच्या हातून आयसीसी चॅम्पियन्स् ट्रॉफीचं आयोजक हे पद शकतं, असं बासित अली म्हणाले.
बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिका
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. यातील पहिली मॅच 21 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. पाकिस्तान बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी रावळपिंडीत होणार आहे. दुसरी कसोटी 30 ऑगस्टपासून कराचीत होणार आहे. यानंतर पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. पाकिस्तान- इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी 7 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. तर, दुसरी कसोटी 15 ऑक्टोबर पासून होणार आहे. तर तिसरी कसोटी 24 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. पाकिस्तान इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका मुल्तान, कराची आणि रावळपिंडी येथे होणार आहे.
भारतीय क्रिकेट संघ 2008 नंतर पाकिस्तानला क्रिकेट खेळण्यासाठी गेलेला नाही. यानंतर 2012 आणि 2013 मध्ये दोन्ही देशांमध्ये मालिका खेळवली गेली होती. 2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील राजकीय संबंध बिघडलेले आहेत. भारतीय क्रिकेट संघ 2023 मध्ये आशिया कप स्पर्धेवेळी देखील पाकिस्तानला गेला नव्हता. भारताचे सामने त्यावेळी श्रीलंकेत आयोजित करण्यात आले होते.
दरम्यान, भारताचे चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामने श्रीलंकेत किंवा दुबईत आयोजित करण्याबाबत देखील विचार केला जाऊ शकतो.
संबंधित बातम्या:
क्रिकेटर पृथ्वी शॉला कोर्टाकडून दुसरं समन्स जारी; 1 ऑक्टोबरला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश
नताशा स्टॅनकोविकने लाईक केलेल्या दोन पोस्ट बनल्या चर्चेचा विषय; सोशल मीडियावर उडाली खळबळ