Babar Azam : अब तेरा क्या होगा बाबर..., पुन्हा कर्णधारपदावरून होणार हकालपट्टी? पाकच्या क्रिकेट विश्वात हालचालीना वेग
Mohammad Rizwan replace Babar Azam as captain : पाकिस्तान क्रिकेटमध्ये सतत हालचाली सुरू आहे. कधी पीसीबीचे अध्यक्ष बदलले जातात, कधी निवड समिती तर कधी कर्णधारपदात बदल होतो.
Babar Azam Pakistan white-ball captain : पाकिस्तान क्रिकेटमध्ये सतत हालचाली सुरू आहे. कधी पीसीबीचे अध्यक्ष बदलले जातात, कधी निवड समिती तर कधी कर्णधारपदात बदल होतो. पाकिस्तानच्या पुरुष क्रिकेट संघाबाबत पुन्हा एकदा मोठी बातमी समोर येत आहे.
रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, लवकरच पाकिस्तानच्या पांढऱ्या चेंडूच्या फॉर्मेटमध्ये कर्णधारात बदल होऊ शकतो आणि बाबर आझमची पुन्हा एकदा कर्णधारपदावरून हकालपट्टी होऊ शकते. बाबरची जागा घेण्याच्या शर्यतीत यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानचे नाव आघाडीवर आहे.
बाबर आझमची कर्णधारपदावरून होणार हकालपट्टी?
खरंतर, 12 ते 29 सप्टेंबर दरम्यान पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स एकदिवसीय चषक होणार आहे, ज्यामध्ये संघासाठी आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबतच देशांतर्गत स्तरावर खेळणारे खेळाडूही सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत एकूण पाच संघ सहभागी होत असून त्यांच्या कर्णधारांचीही घोषणा करण्यात आली आहे.
मोहम्मद रिझवान, शाहीन आफ्रिदी, शादाब खान, मोहम्मद हरीस, सौद शकील हे कर्णधार आघाडीवर दिसणार आहेत. त्याचबरोबर बाबर आझमला कोणत्याही संघाचा कर्णधार बनवण्यात आलेले नाही. त्यामुळेच बाबरला लवकरच पांढऱ्या चेंडूच्या कर्णधारपदावरून हटवण्यात येणार असल्याच्या बातम्या येत आहेत, त्याला या स्पर्धेत कोणत्याही संघाचे नेतृत्व करण्याची संधी देण्यात आलेली नाही.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी होऊ शकतो बदल
पाकिस्तानला या वर्षी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा करायचा आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या दौऱ्यापूर्वी पाकिस्तानला एक नवा एकदिवसीय आणि टी-20 कर्णधार मिळण्याची अपेक्षा आहे. पाकिस्तानचे पांढऱ्या चेंडूचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी दोन महिन्यांपूर्वी याबाबत बोर्ड आणि बाबर आझम यांच्याशी चर्चा केली होती, असेही वृत्तात म्हटले जात आहे. त्याचवेळी, जर सर्व काही सुरळीत झाले तर भविष्यात मोहम्मद रिझवानकडे सर्व फॉरमॅटची कमान दिली जाऊ शकते. पण रिझवानने अद्याप पाकिस्तान संघाचे कर्णधारपद भूषवलेले नाही, परंतु त्याने पीएसएलमध्ये नक्कीच नेतृत्व केले आहे.
गेल्या वर्षी भारतात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय वर्ल्ड कपमधील पाकिस्तानच्या खराब कामगिरीनंतर बाबर आझमने सर्व फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, काही महिन्यांनंतर टी-20 वर्ल्ड कप पाहता त्याला पुन्हा कर्णधार बनवण्यात आले, पण त्याच्या नेतृत्वाखालील संघाची कामगिरी काही खास राहिली नाही आणि पाकिस्तानला सुपर 8 मध्येही पोहोचता आले नाही. त्यामुळे बाबर यांच्यावर बरीच टीका होत होती.
हे ही वाचा -