एक्स्प्लोर

ENG vs SL 3rd Test : भावा तुझ्या कामगिरीला सलाम! ऑली पोपने शतक ठोकून केला मोठा पराक्रम, जो आजवर ना कुणी केला ना कुणाला जमला

Ollie Pope England vs Sri Lanka 3rd Test : श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे.

Ollie Pope Creates History : श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा युवा कर्णधार ऑली पोपने शतक झळकावून एक अप्रतिम विक्रम आपल्या नावावर केला आहे. होय, ऑली पोप हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला फलंदाज ठरला आहे, ज्याने विविध देशांविरुद्ध आपल्या कारकिर्दीतील पहिली सात शतके झळकावली आहेत.

ऑली पोपने केला विश्वविक्रम 

इंग्लंड क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर ऑली पोपने इतिहास रचला आहे. श्रीलंकेसोबत खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ओली पोपने 103 चेंडूत 103 धावांची नाबाद खेळी केली. ऑली पोपचे हे कसोटीतील 7 वे शतक आहे. पोपने असा विश्वविक्रम केला आहे जो आजपर्यंत इतर कोणत्याही फलंदाजाला करता आला नाही.

ऑली पोप कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला फलंदाज ठरला ज्याने 7 वेगवेगळ्या देशांविरुद्ध आपल्या कारकिर्दीतील पहिली सात शतके झळकावली आहेत. होय, पोपचा हा चमत्कार इतिहासाच्या पानांमध्ये नोंदवला गेला आहे. आपल्या कसोटी कारकिर्दीत त्याने दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पाकिस्तान, आयर्लंड, भारत, वेस्ट इंडिज आणि आता श्रीलंकेविरुद्ध शतके झळकावली आहेत.

पोपच्या नावावर आणखी एक विक्रम

पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ओली पोप 103 धावांवर नाबाद राहिला. आता तो दुसऱ्या दिवशी ही धावसंख्या आणखी मोठी करेल, अशी आशा सर्वांना असेल. कर्णधार म्हणून पोपचे हे पहिले शतक आहे. आपल्या खेळीत पोपने आतापर्यंत 103 चेंडूंचा सामना केला असून त्यात त्याने 13 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत.

कसोटीत कर्णधार म्हणून सर्वात वेगवान शतक झळकावणारा तो इंग्लंडचा दुसरा फलंदाज ठरला आहे. पोपने 102 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याच्या आधी इंग्लंडचा कर्णधार म्हणून सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम ग्रॅहम गूचच्या नावावर आहे, ज्यांनी 1990 मध्ये लॉर्ड्सवर भारताविरुद्ध 95 चेंडूत शतक झळकावले होते.

नाणेफेक जिंकल्यानंतर श्रीलंकेने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जिथे प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाने पहिल्या दिवसअखेर 221/3 धावा केल्या आहेत. पोप 103 धावांवर नाबाद राहिला. दुसऱ्या टोकाकडून हॅरी ब्रूक 8 धावांवर नाबाद आहे.

हे ही वाचा -

Aus vs SCO : विराट अन् सूर्याला मागं टाकलं, ऑस्ट्रेलियन खेळाडू वेगवान शतक झळकावत पुढे जाऊनही हिटमॅनचा विक्रम मोडण्यात अपयशी

Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारत पाकिस्तानाला जाणार की नाही? अमित शाहांच्या वक्तव्यानं चित्र स्पष्ट, आता पीसीबीपुढं एकच पर्याय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Thane  : महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका 
रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका 
अग्निशमनच्या जवानांच्या उड्या, जिवाची बाजी लावली; गोदावरीत बुडणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला वाचवलं
अग्निशमनच्या जवानांच्या उड्या, जिवाची बाजी लावली; गोदावरीत बुडणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला वाचवलं
आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणस्थळी धनगर बांधवाचे विष प्राशन; तत्काळ रुग्णालयात हलवले
आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणस्थळी धनगर बांधवाचे विष प्राशन; तत्काळ रुग्णालयात हलवले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Full : Sanjay Gaikwad यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा शिवसेनेला फटका बसणार? सविस्तर चर्चाPune Foreigner Accident : पुण्यात परदेशी पर्यटकांकडून हिट अँड रन, नेमकं प्रकरण काय? ABP MAJHAABP Majha Headlines : 09 PM : 16 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAjit Pawar Ganpati Darshan At Sagar Banglow : अजित पवारांनी घेतले सागर निवासस्थांनी बाप्पाचे दर्शन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane  : महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका 
रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका 
अग्निशमनच्या जवानांच्या उड्या, जिवाची बाजी लावली; गोदावरीत बुडणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला वाचवलं
अग्निशमनच्या जवानांच्या उड्या, जिवाची बाजी लावली; गोदावरीत बुडणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला वाचवलं
आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणस्थळी धनगर बांधवाचे विष प्राशन; तत्काळ रुग्णालयात हलवले
आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणस्थळी धनगर बांधवाचे विष प्राशन; तत्काळ रुग्णालयात हलवले
राज्यपालपदाचं आश्वासन, पण महामंडळच मिळालं; आनंदराव अडसूळांची कॅबिनेट दर्जाच्या पदावर वर्णी
राज्यपालपदाचं आश्वासन, पण महामंडळच मिळालं; आनंदराव अडसूळांची कॅबिनेट दर्जाच्या पदावर वर्णी
48 तास दारूबंदी! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कारण
48 तास दारूबंदी! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कारण
कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल
कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
Embed widget