Brij Bhushan Singh on Vinesh Phogat : "काँग्रेसला पश्चाताप..." बजरंग पुनिया अन् विनेशच्या पक्ष प्रवेशानंतर ब्रिजभूषण सिंह काय म्हणाले? पाहा व्हिडिओ
Haryana Election 2024 : देशाच्या राजकारणावर सध्या हरियाणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची सर्वत्र चर्चा आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोठी खेळी खेळली आहे.
Brij Bhushan Singh on Vinesh Phogat Haryana Election 2024 : देशाच्या राजकारणावर सध्या हरियाणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची सर्वत्र चर्चा आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोठी खेळी खेळली आहे. ऑलिम्पियन कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी निवडणुकीत काँग्रेस पक्षात जागा दिले. त्यानंतर माजी भारतीय कुस्ती महासंघ (WFI) आणि भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे.
ब्रिजभूषण शरण सिंह यांनी पुन्हा एकदा आपल्यावरील आरोप खोटे असल्याचे सांगत काँग्रेस पक्षाचा डाव असल्याचे म्हटले आहे. विनेश आणि बजरंग पक्षात सामील होताच आणि विनेशला तिकीट मिळताच ब्रिजभूषण शरण सिंह यांनी या दोघांसह अनेक काँग्रेस नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला.
भाजप नेते ब्रिजभूषण म्हणाले, 'हे खेळाडूंचे आंदोलन नव्हते तर ते काँग्रेसचे आंदोलन होते. काँग्रेसने आमच्या विरोधात षडयंत्र रचल्याचे आता स्पष्ट झाले. मला हरियाणातील लोकांना सांगायचे आहे की, बजरंग किंवा विनेश यांनी मुलींच्या सन्मानासाठी प्रचार केला नाही, तर त्यांनी राजकारणासाठी महिलांचा वापर केला आणि महिलांचा अपमान केला. ते मुलींच्या सन्मानासाठी नव्हे, तर राजकारणासाठी आंदोलन करत होते.
ब्रिजभूषण शरण सिंह पुढे म्हणाले की, "क्रिडा क्षेत्रात हरियाणा भारतात पुढे आहे. पण तेथे जवळपास अडीच वर्षे कुस्तीचे उपक्रम बंद आहेत. बजरंग आशियाई स्पर्धेत चाचणी न घेता गेला हे खरे नाही का? मी त्या लोकांच्या विरोधात आहे. मला विनेश फोगाटला विचारायचे आहे की, एक खेळाडू एका दिवसात 2 वजनी गटात ट्रायल देऊ शकतो का?... कुस्ती जिंकून तू तिथे गेला नाहीस, तर फसवणूक करून, ज्युनियरच्या अधिकारांचे उल्लंघन करून गेलास? खेळाडूंनो, देवाने तुम्हाला याची शिक्षा दिली आहे.
ते म्हणाले की, "मुलींचा अपमान करण्यात मी दोषी नाही. मुलींचा अपमान करण्यात जर कोणी दोषी असेल, तर ते बजरंग आणि विनेश आहेत. आणि त्याची पटकथा लिहिणारे भूपेंद्र हुड्डा हे त्याला जबाबदार आहेत. जर पक्षाने (भाजप) मला प्रचार करण्यास सांगितले तर मी हरियाणाला जाऊन विनेशच्या विरोधात प्रचार करू शकतो. खोटे बोलल्याबद्दल प्रत्येकाला शिक्षा होईल. एक दिवस काँग्रेसला पश्चाताप करावा लागेल'
#WATCH | On Vinesh Phogat and Bajrang Punia joining Congress, Former WFI president and BJP leader Brij Bhushan Sharan Singh says, "On 18th January 2023 when the protest started at Jantar Mantar, I had said that this is not a movement of sportspersons, Congress is behind it,… pic.twitter.com/XLcwz34R4R
— ANI (@ANI) September 7, 2024
हे ही वाचा -