एक्स्प्लोर
कुंबळेमुळेच चांगली कामगिरी करता आली, मिश्राची कबुली
विशाखापट्टणमः प्रशिक्षक अनिल कुंबळेने दिलेल्या प्रोत्साहनामुळेच मी न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत निर्णायक कामगिरी बजावू शकलो, अशी कबुली टीम इंडियाचा लेग स्पीनर अमित मिश्राने दिली आहे.
मिश्राने नुकतंच न्यूझीलंडविरुद्ध वन डे मालिकेत भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. मिश्राने त्या मालिकेत सर्वाधिक 15 विकेट्स काढून 'मॅन ऑफ द सीरीज'चा किताबही पटकावला.
अमित मिश्रा वयाच्या 34 व्या वर्षी मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोन करताना दिसतोय. कुंबळेने नेहमी तुझाही एक दिवस येईल, असं सांगून मला प्रोत्साहन दिलं, असं मिश्रानं म्हटलं. न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या सामन्यात अमित मिश्राच्या फिरकीसमोर किवी फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली. मिश्राने पाच विकेट्स काढून भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
संबंधित बातमीः दिवाळी धमाका... भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, मालिकाही खिशात!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement